लवकरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयला नवीन अध्यक्ष मिळणार आहेत. भारताचे मोजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुली मागच्या तीन वर्षांपासून ही जबाबदारी पार पाडत आले आहेत. आता भारताला 1983 मध्ये पहिला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या संघात सहभागी असलेले रॉजर बिन्नी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार असल्याचे सांगितेल जात आहे. या विषयी चाहते गांगुलीची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी उत्सुक होते. गुरुवारी (13 ऑक्टोबर) अखेर गांगुलींनी याविषयी मौन सोडले.
अध्यक्षपदाविषयी बीसीसीआयकडून अध्याप कसलीही अधिकृत माहिती मिळाली नाहेय. पण माध्यमांतील वृतांनुसार रॉजर बिन्नी (Roger Binny) यांना अध्यक्ष बनवण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी आधिच केल्या गेल्या आहेत. अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या मनाविरुद्ध असल्याचेही सांगितले गेले आहे. असे असले तरी, आता गांगुलींनी मनाची अक्ष्यपद सोडण्यासाठी मनाची तयारी केल्याचे दिसते. एका बँकेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अध्यक्षपदाविषयी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
गांगुली म्हणाले की, “मी मोठ्या काळापासून प्रशासक राहिलो आहे आणि आता दुसरे काहीतरी करत पुढे जाईल. तुम्ही आयुष्यात काहीही करा, पण सर्वात चांगले दिवस भारतीय संघासोबत खेळतानाचेच असतात. मी बीसीसीआयचा अध्यक्ष राहिलो आणि पुढेही काहीतरी मोठी कामे करत राहील. तुम्ही नेहमीच खेळाडू बनून राहू शकत नाही. तसेच नेहमीसाठी प्रशासक म्हणूनही काम करता येत नाही. ही दोन्ही कामे करून चांगले वाटले.”
“तुम्ही एका दिवसात अंबानी किंवा नरेंद्र मोदी बनू शकत नाही. त्याठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला अनेक महिने आणि वर्ष काम करावे लागते.” असेही गांगुली पुढे बोलताना म्हणाले. रॉजर बिन्नी गांगुलीची जागा घेण्यासाठी तयार असले, तरी बीसीसीआच्या सचिवपदी मात्र जय शाहा कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. येत्या काही दिवसात बीसीसीआयची नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाऊ शकते. वृत्तांनुसार गांगुलींना आयपीएलच्या अध्यक्षपदासाठी प्रस्ताव दिला गेला होता, पण त्यांना हा प्रस्ताव नाकारला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘त्याच्याविरुद्ध खेळताना विचारच करू नका’, गंभीरचा भारतीय फलंदाजांना सल्ला
आता कसं करणार! टी20 विश्वचषकापूर्वी महत्त्वाचे सराव सामने रद्द, यादीत बलाढ्य संघांचा समावेश