गुरुवारी (दि. 08 जून) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने सर्व विकेट्स गमावत 469 धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने संघर्ष केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने 5 बाद 151 धावा बनवल्या होत्या. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत असताना सर्वाधिक धावा बनवणाऱ्या रवींद्र जडेजा याला फिरकीपटू नॅथन लायन याने बाद केले. त्यानंतर माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांनी त्याचे विशेष कौतुक केले.
या सामन्यात भारताच्या प्रमुख फलंदाजांनी कच खाल्ली. भारतीय संघ अडचणीत असताना सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जडेजाने प्रतिआक्रमण केले. त्याने 51 चेंडूवर 48 धावांची वेगवान खेळी केली. यामध्ये सात चौकार व एका षटकाराचा समावेश होता. लायनने स्लीपमध्ये स्मिथच्या हाती त्याला झेल देण्यास भाग पाडले. या व्यतिरिक्त त्याने संपूर्ण दिवसभरात योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले.
त्याच्या याच कामगिरीवर बोलताना गांगुली म्हणाले,
“लायन केवळ भारतीय उपखंडात विकेट बळी नाही. ऑस्ट्रेलियातही तो बळी घेत असतो. उत्कृष्ट सीम पोझीशन तसेच चेंडूला उसळी देत असल्याने तो अधिक घातक बनतो. तो 500 बळींच्या जवळ पोहोचलाय. माझ्यासाठी तो सर्वकालीन महान फिरकी गोलंदाज आहे.”
लायन हा सध्या ऑस्ट्रेलियाचा अव्वल क्रमांकाचा फिरकीपटू आहे. त्याच्या कारकिर्दीवर नजर टाकायची झाल्यास त्याने 119 कसोटी सामने खेळताना 482 बळी टिपले आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या या सायकलमध्ये ऑस्ट्रेलियासाठी त्यांनी सर्वाधिक 83 बळींची नोंद केलेली आहे. ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या फिरकीपटू गोलंदाजांमध्ये त्याचा दुसरा क्रमांक येतो.
(Sourav Ganguly Said Nathan Lyon Is Greatest Spinner)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विक्रमवीर रोहित! 15 धावांवर बाद होऊनही रचला इतिहास, ICC Finalमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा एकटाच खेळाडू
नॉटआऊट असूनही रहाणेला पंचांनी दिले आऊट, मग मैदानात झालेला ड्रामा आख्ख्या जगाने पाहिला; Video