---Advertisement---

“मी विचार केल्याशिवाय बोलत नाही”- सौरव गांगुली

On: बुधवार, जानेवारी 1, 2020 12:34 PM
---Advertisement---

आयसीसी (ICC) कसोटी सामने 5 दिवसांऐवजी 4 दिवस (4 days of test series instead of 5 days) करण्याचा विचार करत आहे. मात्र या कल्पनेवर बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) सध्या मौन बाळगले आहे.

आयसीसीची ही कल्पना सर्व कसोटी सामन्यांसाठी नसून केवळ 2023 पासून सुरु होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशिपच्या वेळापत्रकात येणाऱ्या कसोटी सामन्यांसाठीच असणार आहे. त्याचबरोबर, आयसीसी लवकरच या कल्पनेवर निर्णय घेऊ शकते. परंतु यापूर्वी इतर क्रिकेट मंडळांची सहमती घेणे गरजेचे आहे.

याबद्दल गांगुलीला विचारले असता तो म्हणाला की, “सर्वप्रथम आम्हाला प्रस्ताव पहावा लागेल. हा प्रस्ताव येऊ द्या, त्यानंतर आम्ही पाहू काय करायचं. आता काहीही बोलणे घाईचे ठरेल. तसंही, मी विचार केल्याशिवाय यावर बोलू नाही शकत.”

आयसीसीच्या समितीने विचार केला आहे की, 2023 ते 2031 च्या सत्रातील कसोटी सामने 5 दिवसांऐवजी 4 दिवसांचे करण्यात येतील. त्यामुळे वेळेची बचत होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---