भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली गुरुवारी (08 जुलै) म्हणाले की, कोरोना महामारीमुळे जर या वेळेसही टी20 विश्वचषक रद्द झाला, तर खेळासाठी हे मोठे नुकसान असेल. गांगुली यांनी पत्रकारांशी बोलताना ही गोष्ट सांगितली. यादरम्यान, त्यांनी पुन्हा एकदा या गोष्टीचा उल्लेख केला की, बीसीसीआयला सर्व खेळाडूंच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर ठेऊन यंदाचा आयसीसी टी20 विश्वचषक युएईमध्ये आयोजित करावा लागेल.
यापूर्वी टी20 विश्वचषक भारतामध्ये आयोजित केला जाणार होता. परंतु भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहता युएई आणि ओमानमध्ये विश्वचषक सामने खेळवले जाणार आहेत. याबाबत गांगुली म्हणाले, “मला याची खंत वाटत आहे. पण संपूर्ण आयुष्यात कोणीही अशा परिस्थितीचा कधी सामना केला नव्हता. मागच्या वर्षीही विश्वचषक रद्द करण्यात आला होता. जर याही वेळी कोरोनामुळे विश्वचषक रद्द झाला तर खेळाचे खूपच नुकसान होईल. म्हणून आम्ही विश्वचषकाचे सर्व सामने सुरक्षित ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.”
परंतु जर सर्वकाही ठीक राहिले, तर टी20 विश्वचषक 2021 वेळापत्रकानुसार संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएई येथे होईल. ही स्पर्धा 17 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. तर या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना 14 नोव्हेंबरला होणार आहे. भलेही विश्वचषत युएईत हलवण्यात आला आहे, मात्र बीसीसीआय या मोठ्या स्पर्धेचा यजमान म्हणून कायम राहणार आहे. 16 संघांची ही स्पर्धा यूएईच्या तीन शहरांमध्ये म्हणजेच दुबई, शारजाह, अबू धाबी आणि ओमान येथे खेळली जाणार आहे.
These are exceptional circumstances. Last year WorldCup got cancelled. This year if it again gets cancelled because of Covid, then it is a massive loss for the game: BCCI President Sourav Ganguly pic.twitter.com/DBdCBzBWDL
— ANI (@ANI) July 8, 2021
निवडीबाबत गांगुलींनी सोडले मौन
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दुखापत झालेला सलामीवीर शुभमन गिलच्या जागी कोणत्याही खेळाडूला इंग्लंडला न पाठवण्याच्या निर्णयावरून झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. गुरुवारी गांगुली त्यांच्या 49 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलत असताना त्यांना वादग्रस्त विषयाबद्दलही विचारण्यात आले होते. त्यावर ते म्हणाले की, “हा पूर्णपणे निवड समितीचा निर्णय आहे.”
विशेष म्हणजे भारतीय संघ व्यवस्थापक गिरीश डाँग्रे यांनी गिलच्या जागी दोन सलामीवीर इंग्लंडला पाठवण्यास सांगितले होते. त्यांनी पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिकक्कल यांची नावेही त्यांनी सुचविली होती. परंतु निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी दोन दिवसांपूर्वी कोणतेही औपचारिक उत्तर पाठवले नाही. कारण संघात अगोदरच चार सलामीवीर खेळाडू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मला हजारो लोकांनी नको नको त्या शिव्या दिल्या’; समालोचक दिनेश कार्तिकने मांडली व्यथा
SLvIND: पडीक्कलच्या फॉर्मने वाढवली टीम इंडियाची चिंता, सैनीच्या गोलंदाजीवर दिसला संघर्ष करताना
गिलच्या पर्यायी खेळाडूवरुन कोहली-निवडकर्ते आमनेसामने, बीसीसीआय अध्यक्षाची आली प्रतिक्रिया





