आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(आयसीसी)ची विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा झाल्यानंतर आता क्रिकेट जगतामध्ये टी-२० विश्वचषकाचे वारेवाहू लागले आहेत. या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी कोविडसारख्या परिस्थितीला सामोरे जावं लागत आहे. यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा भारतात होणार होती परंतु, भारतात कोरोनाचे वाढते संक्रमण पाहून विश्वचषक स्पर्धेचं आयोजन संयुक्त अरब अमिराती येथे करण्याचे बीसीसीआयने ठरवले आहे.
सोमवारी(२८ जून) झालेल्या बैठकीनंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सेक्रेटरी जय शाह यांनी माहिती दिली की, भारतात आयोजित केलेली टी-२० विश्वचषक स्पर्धा आता युएईमध्ये खेळवण्यात येईल. गांगुलीने सांगितले की, सर्व खेळाडू आणि इतर लोकांच्या आरोग्याची सुरक्षा विचारात घेऊन हा निर्णय घेतला आहे. दरम्यान,गांगुलीने स्पष्ट केले की, स्पर्धेचे वेळापत्रक अजून तयार केले गेले नाही आहे. परंतु, लवकरच टी-२० स्पर्धेचे वेळापत्रक आपल्या समोर असेल.
पीटीआयसोबत बोलताना गांगुली म्हणाला की, “आम्ही आयसीससीला या गोष्टीची माहिती दिली आहे की, यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा युएईमध्ये खेळवली जाईल. याबद्दल आम्ही एक आरखडा तयार केला आहे. सर्वांच्या आरोग्याच्या काळजीपोटी हा निर्णय घेण्यात आला आहे.”
गांगुलीला विचारले गेले की, स्पर्धा १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार का, त्यावर गांगुलीने सांगितले की, “आम्ही कार्यक्रमाचे नियोजन आणि वेळापत्रक अजून बनविले नाही आहे. लवकरच या गोष्टीवर निर्णय घेणार आहोत.”
आयसीसीनेसुद्धा सांगितले की, अजून आम्ही या स्पर्धेच्या कार्यक्रमाबद्दल विचार केला नाही. आयसीसीने बीसीसीआयला विश्वचषकाच्या ठिकाणाबद्दल विचार करण्यासाठी जून महिन्याच्या सुरुवातीपासून ४ आठवड्याचा वेळ दिला होता.
त्यावर उत्तर देताना बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले, “ही गोष्ट इतकी सोपी नव्हती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे खेळाडू आणि आयोजकांचे आरोग्य आणि स्वास्थ्य विचारात घेऊन निर्णय घ्यावा लागला.”
महत्त्वाच्या बातम्या –
WTC फायनलनंतर कडाडून टीकेचा सामना करणाऱ्या भारतीय संघाच्या मदतीला धावला विलियम्सन, म्हणाला…
चूकिला माफी नाही! गोव्यातील गावात कचरा फेकण्याबद्दल अजय जडेजावर सरपंचांकडून कारवाईचा बडगा
‘तू यशास पात्र’! एकाच दिवसात ३ सुवर्णपदक जिंकणाऱ्या दीपिका कुमारीची मास्टर ब्लास्टरने थोपटली पाठ