नवी दिल्ली। भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ सोमवारी (२७ जुलै) संपुष्टात आला. कूलिंग ऑफ पिरियड(विश्रांती)च्या नियमाचे पालन करत भारतीय क्रिकेट प्रशासनात गांगुलीच्या ६ वर्षांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. बीसीसीआयच्या घटनेनुसार आता त्याला भारतीय क्रिकेट प्रशासनात परत येण्यास ३ वर्षे लागतील. यानंतरच तो कोणत्याही राज्य क्रिकेट संघात किंवा बीसीसीआय प्रशासनात जबाबदारी सांभाळू शकतो.
तरीही यादरम्यान गांगुली आयसीसीमध्ये (ICC) कोणतेही पद मिळवू शकतो. परंतु यासाठी त्याला बीसीसीआयची (BCCI) परवानगी घ्यावी लागेल तसेच त्याला इतर राष्ट्रीय क्रिकेट बोर्डांचे समर्थन मिळणेही आवश्यक आहे.
‘दादा’ या नावाने ख्याती असलेल्या गांगुलीचा कार्यकाळ समाप्त होण्याचा अर्थ असा होत नाही की, तो आपल्या पदावरून मुक्त होईल. खरंतर बीसीसीआयने सुप्रिम कोर्टाकडून कूलिंग ऑफ पिरियड (विश्रांती)च्या नियमात संशोधनाची (बदल) मागणी केली आहे आणि याची सुनावणी १७ ऑगस्ट रोजी होणार आहे.
अशामध्ये गांगुलीच (Sourav Ganguly) नाही, तर बोर्डाचे सचिव जय शाहदेखील (Jay Shah) आपला कार्यभार सांभाळत राहणार आहेत. कारण शाहचा कार्यकाळ मे महिन्यात समाप्त झाला आहे, तर संयुक्त सचिव जयेश जॉर्ज (Jayesh George) यांचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यात समाप्त होणार आहे.
२७ जुलैला गांगुलीचा बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपणार होता. कारण २७ जुलै २०१४ मध्ये त्याने बंगाल क्रिकेट असोसिएशनमध्ये सचिव पदाचा कार्यभार सांभाळला होता, तर पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये बंबंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यानंतर ऑक्टोबर २०१९मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष पद सांभाळले होते. तरीही आतापर्यंत हे अधिकारी आपल्या पदावर केव्हापर्यंत आणि का आहेत, याबाबत बीसीसीआयने अधिकृत पुष्टी केलेली नाही.
हे बोर्डाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे आहे आणि असा एक विभाग आहे की बहुमतामध्ये जे घडते त्यानुसार कोर्टाने निर्णय देईपर्यंत यथास्थिति असावी. या गटासाठी चांगली बाब अशी की, न्यायाधीशांनी बीसीसीआयचे पुनरावलोकन आवाहन नाकारले नाही.
नियमांनुसार एखाद्या अधिकाऱ्याचे रिक्त पद ४५ दिवसांत भरायचे असते आणि हे केवळ निवडणुका घेऊनच केले जाऊ शकते, जे लॉकडाऊन पूर्णपणे उघडल्याशिवाय शक्य नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
-आयर्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर, ४ वर्षांनी दिग्गज खेळाडू करतोय कमबॅक
-ICC वर्ल्ड कप सुपरलीग: फ्रंटफूट नोबॉलवर असणार थर्ड अंपायरची करडी नजर, पहा आयसीसीचे नवे नियम
-मोहम्मद आमिर इंग्लंडला जाण्याच्या लायकीचा नाही