सौरव गांगुली भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक असा खेळाडू आहे, ज्याने हव्या असतील त्या सर्व गोष्टी जवळपास मिळवल्याच आहेत. अनेक वर्ष भारतीय संघाचे नेतृत्व केल्यानंतर गांगुलींनी मागच्या तीन वर्षात बीसीसीआयचे अध्यक्षपद चांगल्या प्रकार पार पाडले. पण आता त्यांच्यावर हे पद सोडण्याची वेळ आली आहे. बंगालचा सत्ताधारी पक्ष तृणमूल कॉंग्रेसकडून याविषयी मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. गांगुलींची कोंडी करण्यामागे भारतीय जनता पार्टीचा हात असल्याचे टीएमसीकडून सांगितले गेले आहे.
माहितीनुसार सौरव गांगुली (Sourav Ganguly) पुन्हा एकदा बीसीसीआयचे अध्यक्ष बनू इच्छित होते, पण त्यांना स्वतःच्या लोकांचीच साथ मिळत नाहीये. याच कारणास्तव त्यांना हे पद सोडावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी (11 ऑक्टोबर) मुंबईमध्ये बीसीसीआयच्या मुख्यालयात एम मोठी बैठक पार पडली. याठिकाणी पूर्ण देशातून मोठमोठे अधिकारी उफस्थित होते. बीसीसीआयच्या नियमानुसार जुने अध्यक्षच नवीन अध्यक्षाचे नाव सुचवत असतात, पण माहितीनुसार गांगुलींना मात्र पुन्हा एकदा अध्यक्षपदी विराजमान होऊ इच्छित होते. परंतु त्यांना इतरांचा पाठिंबा मात्र मिळत नाहीये.
या सर्व बातम्यांमध्ये बांगलचा सत्ताधारी पक्ष तृणमूल कॉंग्रेस म्हणजे टीएमसीकडून मोठा दावा केला गेला आहे. टीएमसीच्या मते भाजपामुळेच सौरव गांगुलींना हे पद सोडावे लागत आहे. कारण भाजपा त्यांना पार्टीमध्ये सहभागी करून घेऊ इच्छित होती, परंतु त्यांना ते जमले नाही. टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी सांगितले की, “भाजपाने मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधी लोकांमध्ये असा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता की, राज्यात लोकप्रिय असेलेले गांगुली त्यांच्या पक्षात सहभागी होणार आहेत.” हा एकप्रकारे राजकीय सूड घेण्याचा प्रकार असल्याचेही टीमसीचे नेते आणि कार्यकर्ते म्हणत आहेत. केंद्रिय गृहमंत्री अमित शहांचा मुलगा जय शहा जर बीसीसीआयच्या सचिवपदी कायम राहू शकतो, तर गांगुली अध्यक्षपदी का कायम राहू शकत नाहीत, असाही प्रश्न टीएमसीकडून उपस्थित केला जात आहे.
मंगळवारी पार पडलेल्या बैठकित गांगुलींना स्वतःची नाराजी लपवण्याचा कुठलाही प्रयत्न केला नसल्याचेही सांगितले जात आहे. माध्यमांतील वृत्तानुसार गांगुलींना आयपीएलचे अध्यक्षपद सांभाळण्यासाठी प्रस्ताव दिला गेला होता. पण बीसीसीआय अध्यक्षावरून आयपीएल अध्यक्ष बनने त्यांच्या मनाला पटले नाही. बीसीसीआयचे अध्यक्षपत सोडल्यानंतर ते कुठल्याची समितीचे अध्यक्ष बनणार नाहीत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दिल्ली वनडे गाजवलेल्या कुलदीपची रॅंकींगमध्येही भरारी! सिनियर्सची मात्र घसरगुंडी
चालू सामन्यात ज्युनिअरच्या अंगावर धावून गेला अंबाती रायुडू, पंचांनाही खटकलं कृत्य






