---Advertisement---

हे दोन विश्वविजेते बुद्धिबळपटू वाजवणार दिवस-रात्र कसोटी सामन्याची घंटा

On: शनिवार, नोव्हेंबर 9, 2019 1:29 PM
---Advertisement---

22 lते 23 नोव्हेंबर दरम्यान ईडन गार्डन, कोलकाता (Eden Garden, Kolkata) येथे भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात दिवस-रात्र कसोटी (Day-Night Test) सामना पार पडणार आहे.

या सामन्याआधी विश्वविजेते बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन (Magnus Carlsen) आणि विश्वनाथन आनंद (Viswanathan Anand) हे दोघे  कसोटी सामना सुरू होण्याची घंटा वाजवणार असल्याची शक्यता आहे.

भारतात दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्याची भारताची ही पहिलीच वेळ (Indias First Time Day-Night Test) असणार आहे. या सामन्याची सुरुवात अनोख्या पद्धतीने व्हावी यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचं आमंत्रण भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने स्विकारले आहे. तसेच, नाॅर्वेच्या विश्वविजेता मॅग्नस कार्लसनच्या संमतीचीही वाट पाहत आहेत.

कार्लसन टाटा स्टील चेस इंडिया – रॅपिड आणि  ब्लिट्झ 2019 खेळण्यासाठी भारतात आला आहे. ही स्पर्धा ग्रँड चेस टूरचा एक भाग आहे.

“बीसीसीआयने ईडन गार्डनमध्ये कसोटी सामना सुरु होण्याची घंटा  वाजवण्यासाठी कार्लसनला आमंत्रित केले आहे. जर वेळ मिळाला तर कार्लसन आणि आनंद यांना दिवस-रात्र कसोटी सामन्यातील पाच दिवसांपैकी एक दिवस स्टेडियमवर दिसू शकतात,” असे चेस टूर स्पर्धेचे अधिकृत प्रायोजक आणि ब्रँड पार्टनर गेमप्लेन स्पोर्ट्सचे संचालक जीत बॅनर्जी (Jeet Banerjee) म्हणाले.

“हा कार्यक्रम तयार करणे चिंतेचे कारण ठरू शकते. कारण कसोटी सामन्याची आणि बुद्धिबळ स्पर्धेची वेळ जवळपास सारखीच आहे,” असे आयोजकांपैकी एकाने सांगितले.

कार्लसन आणि विश्वनाथन आनंदबरोबरच या सामन्यातील एका दिवसाची सुरुवात बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना (Prime Minister Sheikh Haseena) देखील घंटा वाजवून करणार आहेत.

या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar), ऑलिंपिक विजेता अभिनव बिंद्रा (Abhinav Bindra), टेनिसस्टार सानिया मिर्झा (Sania Mirza), बॅडमिंटन विश्वविजेता पी. व्ही. सिंधू (P.V. Sindhu) आणि दिग्गज बाॅक्सर एम सी मेरी (MS Mary Kom) काेम हे खेळाडू येणार आहेत.

बंगाल क्रिकेट मंडळ 2000 मध्ये भारत विरुद्ध बांगलादेश संघात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील संघाचाही सन्मान करेल. या सामन्यात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण केले होते.

https://twitter.com/Maha_Sports/status/1192744098312019968

https://twitter.com/Maha_Sports/status/1192688871009468416

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---