नामांकित लोक आणि त्यांच्या संबंधित व्यक्तींना प्रसिद्धी सोबतच अनेक त्रासांना देखील सामोरे जावे लागते. अशाच प्रकारच्या त्रासाचा सामना भारतीय संघाचा माजी कर्णधार व बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या पत्नी डोना यांना करावा लागला. आपल्या नावाने बनावट फेसबुक पेज बनवल्या प्रकरणी डोना यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
डोना यांनी केली तक्रार दाखल
सौरव गांगुली याची पत्नी डोना यांनी आपल्या नावे बनावट फेसबुक पेज बनवल्या प्रकरणी अज्ञात इसमा विरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. डोना यांनी आपल्या तक्रारीत म्हटले, ‘माझ्या नावाचा वापर करून आणि सौरव यांच्यासोबतचे माझे छायाचित्र वापरुन कोणीतरी बनावट फेसबुक पेज तयार केले आहे. माझ्या एका विद्यार्थ्यीनीने मला याबाबत सांगितले. आम्हा दोघांचे छायाचित्र वापरले गेले याविषयी काही प्रश्न नाही. मात्र, काही वेळा लोक टिप्पण्या करणे सुरू करतात. यामुळे गैरसमज निर्माण होतात. मला आशा आहे की, पोलीस हे प्रकरण मिटवतील.’
पोलिसांनी दिली प्रतिक्रिया
या प्रकरणाविषयी पोलिसांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “फेसबुक पेज बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या आयपी ऍड्रेसची ओळख झाली आहे. लवकरात लवकर आम्ही त्या व्यक्तीवर कारवाई करू.”
सुप्रसिद्ध नृत्यांगना आहे डोना
सौरव गांगुली यांची पत्नी डोना गांगुली या प्रसिद्ध ओडिषा नृत्यांगना आहेत. सदर बनावट फेसबुक पेजवरून डोना यांच्यासह त्यांची मुलगी सना हीची देखील काही छायाचित्रे शेअर करण्यात येत होती. या बनावट पेजचे तब्बल ७०,००० फॉलोअर होते.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ : ‘हे’ आहेत आयपीएलच्या प्रत्येक संघाचे महागडे खेळाडू
आयपीएल २०२१ : पंजाबचा नवा लोगो आला रे ! केला ‘हा’ मुख्य बदल