आयसीसीचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आपला कार्यकाळ संपण्याच्या अवघ्या २ महिन्यांपूर्वीच आयसीसीचे अध्यक्षपद सोडले. आता लवकरच आयसीसी अध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल विचार करीत आहे.
निवडणुकीविषयी चर्चा होती की बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली देखील या पदासाठी अर्ज करताना दिसेल. परंतु काही गोष्टी आणि परिस्थितीचा विचार करता हे घडणे फार कठीण आहे. त्यामुळे गांगुलीसाठी ही निवडणुक लढविणे कठीण वाटत आहे.
आज त्या 3 कारणांबद्दल जाणून घेऊ, ज्यामुळे सौरव गांगुली कदाचित आयसीसी अध्यक्षपदासाठी दावा करताना दिसणार नाही. बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या अलिकडील विधानांनी हे कारण स्पष्ट असल्याचे संकेत दिले आहेत.
1. बीसीसीआयकडे आहे अधिक ताकद
जर आपण क्रिकेटमधील मोठ्या ताकदीबद्दल विचार केला तर बीसीसीआयकडे ती अधिक आहे. कोरोना विषाणू महामारीनंतर संपूर्ण क्रिकेट ठप्प झालं. आता संपूर्ण जग बीसीसीआयकडे नजर लावून आहेत. जेणेकरून क्रिकेटचा खेळ पुन्हा मजबुतीने उभारण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. खरं तर सौरव गांगुली अध्यक्ष असताना हे काम करता येऊ शकत.
यामुळे बीसीसीआय सौरव गांगुलीचे नाव आयसीसीकडे सुपूर्द करणार नाही. बीसीसीआयलाही आता यावेळी सशक्त नेत्याची आवश्यकता आहे. त्यांना गांगुलीपेक्षा आणखी मजबूत व्यक्तीमत्व मिळणार नाही. त्यामुळे ते या गांगुलीचे नाव पुढे पाठवू शकत नाहीत असे चिन्ह दिसत आहेत.
गांगुलीलाही वाटत असेल की सध्या बीसीसीआयसाठी चांगल्या पद्धतीने काम केले तर क्रिकेटची सुरुवात एका चांगल्या प्रकारे होऊ शकते. बीसीसीआईची नजर सध्या आयपीएल २०२० वर आहे. ज्यासाठी सौरव गांगुली यांच्या नेतृत्वात बोर्ड पुढे जाण्याचा प्रयत्न करेल.
२. स्वतः सौरव गांगुलीने म्हटले की, वय अजून शिल्लक आहे.
अलीकडेच, सौरव गांगुलीने त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यानी मुलाखत दिली. त्यामध्ये जेव्हा त्याला आयसीसीमध्ये जाण्यासंदर्भात विचारण्यात आले तेव्हा त्याने उत्तर दिले की “सध्या माझ्याकडे बरेच वर्षे शिक्ल्लक आहे. त्यामुळे भविष्यात बर्याच संधी मिळू शकतात.”
सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष झाला त्याला, अजून एक वर्ष पूर्ण झालेले नाही. आता जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बीसीसीआयच्या बाजूने आला तर पुढील दोन वर्षे सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची भूमिका बजावू शकतो.
स्वत: गांगुलीनी कबूल केले की सध्या बीसीसीआयमध्ये फारसे अनुभवी लोक नाहीत. यामुळे, जर गांगुलीने हे पद सोडले आणि आयसीसीमध्ये रुजू झाले तर बीसीसीआयला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे, सध्या बीसीसीआयलाच गांगुलीची पहिली पसंती असेल.
३. ईसीबीला दिले वचन
सध्या चालू असलेल्या वृत्तावरील अहवालांवर विश्वास ठेवल्यास बीसीसीआयने ईसीबीला (England and Wales Cricket Board -ECB) सांगितले होते की यावेळी अध्यक्षपदासाठी ते त्यांच्या प्रतिनिधीला पाठिंबा देतील. आता त्यानंतर ईसीबीकडून कोलिन ग्रेव्ह्ज (Colin Graves) यांना आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार करण्याचा निर्णय ईसीबीने घेतला आहे.
अशा परिस्थितीत गांगुली आपल्या वक्तव्यावर ठाम राहून माघार घेऊ शकतो. सध्या संपूर्ण प्रकरण बीसीसीआयच्याच हाती आहे. ज्यामुळे सर्वांची नजर बीसीसीआयकडे आहे. जर बीसीसीआयला त्यांचा फायदा हवा असेल तर ईसीबीचा प्रतिनिधी पुढील अध्यक्ष असू शकतो. त्यासाठी आता काही मोठे निर्णय घ्यावे लागतील.
वाचनीय लेख –
आपल्या शेवटच्या सामन्यात सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणणारे २ भारतीय कर्णधार
ते चार खेळाडू ज्यांना डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षा उत्तम फलंदाज म्हटले जात
जगातील सर्वात दुर्दैवी १० क्रिकेटपटू, ज्यांना मैदानावरच गमवावा लागला प्राण