स्टार स्पोर्ट्सच्या हिंदी कॉमेंट्री पॅनलमध्ये गांगुलीसोबत (Sourav Ganguly) हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि एस श्रीसंत देखील चाहत्यांचे भरभरून मनोरंजन करताना दिसणार आहेत. त्याचबरोबर रवी शास्त्री, सुनील गावसकर, दिनेश कार्तिक आणि हर्षा भोगले या दिग्गज खेळाडूंचा समावेश इंग्लिश समालोचांमध्ये आहे. दिनेश कार्तिकचाही (Dinesh Karthik) कॉमेंट्री पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे. कार्तिककडे यापूर्वी डब्लूटीसीच्या अंतिम सामन्यात समालोचन करण्याचा अनुभवन आहे.
हिंदी समालोचन संघ:
सौरव गांगुली, हरभजन सिंग, एस श्रीसंत, जतिन सप्रू, दीप दासगुप्ता.
इंग्रजी समालोचन संघ:
रवी शास्त्री, हर्षा भोगले, नासेर हुसेन, दिनेश कार्तिक, रिकी पाँटिंग, मॅथ्यू हेडन, जस्टिन लँगर, कुमार संगकारा आणि सुनील गावस्कर.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान खेळवला जाईल. तर फायनलसाठी राखीव दिवसही ठेवण्यात आले आहेत. लंडनमधील ओव्हल मैदानावर होणाऱ्या या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीची लढत पहायला मिळू शकते.
डब्लूटीसी फायनसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू- सूर्यकुमार यादव, मुकेश कुमार, यशस्वी जैस्वाल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
”बाहेरच्या देशात जाऊन भारताचे नाव…” आकाश चोप्राची राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका
WTC फायनलआधी ऑस्ट्रेलियाच्या युवा गोलंदाजाचा एल्गार, म्हणाला, “भारताविरुद्ध मी…”