ऑस्ट्रेलिया सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात गुरुवारी (27 ऑक्टोबर) पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश (SAvBAN) असा खेळला गेला. पहिल्या सामन्यात दुर्दैवीरीत्या सामना रद्द करावा लागल्याने विजयापासून वंचित राहिलेल्या दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात खेळाच्या तीनही विभागात बांगलादेशला पूर्णपणे पटखनी देत 104 धावांनी विजय साजरा केला. शानदार शतकी खेळी करणारा रायली रुसो (Rilee Rossouw) सामन्याचा मानकरी ठरला.
South Africa register a thumping win over Bangladesh, clinching two crucial points.#T20WorldCup | #SAvBAN | 📝: https://t.co/Ji9TL3CpQ9 pic.twitter.com/uIxptSdIEK
— ICC (@ICC) October 27, 2022
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात सुरुवात खराब केली. कर्णधार टेंबा बवुमा हा केवळ दोन धावा काढून माघारी परतला. मात्र, त्यानंतर क्विंटन डी कॉक व रायली रुसो यांनी बांगलादेशी गोलंदाजांची पिसे काढली. त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी तब्बल 168 धावा जोडल्या. डी कॉक 38 चेंडूवर 63 धावा काढून माघारी परतला. मात्र, रूसोने आपली आक्रमक फलंदाजी तशीच सुरू ठेवली. त्याने 52 चेंडूंवर आपल्या टी20 कारकीर्दीतील दुसरे शतक झळकावले. बाद होण्यापूर्वी त्याने 56 चेंडूवर 7 चौकार व 8 षटकारांच्या मदतीने 109 धावा केल्या. मात्र, अखेरच्या चार षटकात इतर फलंदाजांना धावांची अपेक्षित गती न राखता आल्याने दक्षिण आफ्रिकेचा डाव 205 धावांपर्यंत मर्यादित राहिला.
या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने पहिल्या षटकात 19 धावा चोपल्या. मात्र, एन्रिक नॉर्किएने दुसऱ्या षटकात दोन्ही सलामीवीरांना बाद केले. त्यानंतर बांगलादेशचा डाव सावरलाच नाही. दक्षिण आफ्रिकेचे फिरकीपटू तबरेझ शम्सी व केशव महाराज यांनी घातक गोलंदाजी करत बांगलादेशच्या फलंदाजांना अडचणीत आणले. शम्सीने तीन बळी घेत बांगलादेशची मध्यफळी कापून काढली. तर नॉर्किएने सर्वाधिक चार बळी आपल्या नावे केले. बांगलादेशसाठी लिटन दासने सर्वाधिक 34 धावा केल्या. बांगलादेश डाव अवघ्या 101 धावांवर संपुष्टात आला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक नेदरलँड्सविरूद्ध खेळणार का? गोलंदाजी प्रशिक्षकांनी स्वतः केला खुलासा
भारत-नेदरलँड्स सामन्यात पाऊस बनणार का खलनायक? असा असेल सिडनीचा मौसम