श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आर प्रेमदासा स्टेडियमवर पार पडला. हा सामना सुरू होण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिका संघाने या मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली होती. दरम्यान, अंतिम टी -२० सामन्यात १० गडी राखून विजय मिळवत दक्षिण आफ्रिका संघाने ही मालिका ३-० ने आपल्या खिशात घातली आहे. या सामन्यात तुफानी फटकेबाजी करत अर्धशतक झळकावणाऱ्या क्विंटन डी कॉकला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या सामन्यात यजमान श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून पाहुण्या दक्षिण आफ्रिकन संघाला प्रथम गोलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. श्रीलंका संघाकडून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज कुसल परेराने चांगली सुरुवात करून दिली होती. त्याने या डावात ३३ चेंडूंमध्ये ३ चौकरांच्या साहाय्याने ३९ धावांची खेळी केली. तर करूणारत्नेने १९ चेंडूंमध्ये २ षटकारांच्या साहाय्याने २४ धावा केल्या.
इतर कुठल्याही श्रीलंकन फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. परिणामी २० षटकांअखेर श्रीलंका संघाला ८ बाद १२० धावा करण्यात यश आले. तर दक्षिण आफ्रिका संघाकडून गोलंदाजी करताना ब्योर्न फॉर्च्यून आणि कगिसो रबाडा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
श्रीलंका संघाने दिलेल्या १२१ धावांचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक आणि हेंड्रिक्स यांची जोडी मैदानात आली होती. लक्ष्य जास्त मोठे नव्हते, त्यामुळे दोन्ही सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. हेंड्रिक्सने ४२ चेंडूंचा सामना करत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद ५६ धावांची खेळी केली. तर क्विंटन डी कॉकने ४६ चेंडूंचा सामना करत ५९ धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिका संघाने हे आव्हान १४.४ षटकातच गाठले आणि मालिका ३-० ने आपल्या खिशात घातली.(South Africa beat Srilanka by 10 wickets)
या संपूर्ण मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंका संघाल बॅकफूटवर ठेवले होते. या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंका संघाला २८ धावांनी पराभूत करत मालिकेत १-० ची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या टी -२० सामन्यात देखील दक्षिण आफ्रिका संघाने अप्रतिम कामगिरी करत श्रीलंका संघावर ९ गडी राखून विजय मिळवत मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली होती. अंतिम टी -२० सामन्यात श्रीलंका संघाला १० गडी राखून पराभूत करत या मालिकेत विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई आणि चेन्नई यांच्यात रंगेल आयपीएल २०२१ चा अंतिम सामना, पाहा कोणी केलंय भाकीत?
महिला फिरकीपटूच्या ‘जादुई स्पिन’ने काही कळायच्या आतच फलंदाज बोल्ड, व्हिडिओ पाहून आठवेल शेन वॉर्न
कुंबळे अन् जाफरमध्ये जोरदार जुगलबंदी; ‘कभी अलविदा ना कहना’, गात रंगवली मैफिल- VIDEO