Dean Elgar Statement: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील केपटाऊन कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी तब्बल 23 विकेट्स पडल्या. एकाच दिवशी दोन्ही संघ सर्वबाद झाले आणि दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेने 3 विकेट्स गमावल्या. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिकेचा हंगामी कर्णधार डीन एल्गर याला विश्वास आहे की, जर या खेळपट्टीवर त्यांच्या संघाला बचावासाठी 100 धावा मिळाल्या तर ते हा स्कोर डिफेंड करतील.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कर्णधार डीन एल्गर (Dean Elgar) म्हणाला, “100 धावांचे टार्गेट द्यायचे म्हटले तर ते मी लगेच स्वीकारेन. आमचे गोलंदाज असे आहेत की, जर त्यांनी ठरवलं तर ते जगातील कोणत्याही फलंदाजीला उद्ध्वस्त करू शकतात. मला माहित नव्हते की, खेळपट्टी अशी असेल. तसे अजिबात दिसत नव्हते. मात्र, तरीही तुम्हाला योग्य जागेवर चेंडू टाकावा लागेल आणि भारताने यावेळी तेच केले.”
केपटाऊन कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे चुकीचा ठरला. मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याच्या घातक गोलंदाजीसमोर प्रोटीज संघ पहिल्या डावात अवघ्या 55 धावांत गारद झाला. सिराजने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत 6 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाची फलंदाजीही चांगली झाली नाही आणि भारतीय संघाला केवळ 153 धावा करता आल्या. एकेकाळी भारताची धावसंख्या 153-4 अशी होती, पण त्यानंतर संघाने एकही धाव न करता आपले उर्वरित सहा विकेट्स गमावल्या. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने 3 विकेट्स गमावून 62 धावा केल्या असून अजूनही भारतापेक्षा 36 धावांनी पिछाडीवर आहे. (South Africa captain’s eye-catching statement about the Cape Town Test said We will score 100 runs on this wicket)
हेही वाचा
IND vs SA: नांद्रे बर्गरने घेतला विराटसोबत पंगा; कोहलीने दिले आपल्या शैलीत उत्तर, पाहा व्हिडिओ
रोहितमुळे शुबमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागते, खुद्द कर्णधारानेच केला खुलासा