आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी 2025चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. या स्पर्धेत 8 संघ सहभागी होणार आहे. त्यामध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. यापैकी भारत-पाकिस्तान सोडून सर्व देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अॅनरिक नॉर्टजे (Anrich Nortje) चॅम्पियन्स ट्राॅफीमधून बाहेर पडला आहे.
यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या आशांना मोठा धक्का बसला. वेगवान गोलंदाज अॅनरिक नॉर्टजे (Anrich Nortje) पाठीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला. त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेच्या 15 सदस्यीय संघात समाविष्ट केले होते. पण आता तो स्पर्धेत खेळताना दिसणार नाही.
चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ (21 फेब्रुवारी) रोजी कराची, पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानविरूद्ध आपल्या मोहिमेची सुरूवात करणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघ- तेम्बा बवुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, ॲनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रास व्हॅन डर ड्यूसेन
🚨 ANRICH NORTJE – RULED OUT OF SA20 AND CHAMPIONS TROPHY. 🚨 pic.twitter.com/wuccrPSPlA
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 15, 2025
महत्त्वाच्या बातम्या-
Champions Trophy; भारतीय संघाच्या घोषणेसाठी एवढा वेळ का? माजी क्रिकेटपटूने साधला निशाना
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी, जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत मोठं अपडेट
दिग्गज विराट कोहलीसाठी आजचा दिवस खूप खास, जाणून घ्या यादिवशीचे ‘विराट’ रेकाॅर्ड्स