दक्षिण आफ्रिकेने आयसीसी ने आयोजीत केलेल्या स्पर्धांपैकी फक्त चॅम्पियन्स ट्रॉफीच आजपर्यंत आपल्या नावावर केली आहे. एकदिवसीय विश्वचषक आणि टी२० विश्वचषकामध्येही दक्षिण आफ्रिकेला चांगली कामगिरी करता आलेली नाही. २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंतच दक्षिण आफ्रिकेला मजल मारता आली होती. २०१६च्या टी २० विश्वचषक स्पर्धेत तर दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरी फेरीही गाठता आलेली नव्हती. आता चालू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतही त्याना चांगली कामगिरी करता आली नाही. दक्षिण आफ्रिका या स्पर्धेत ए बी डिविलर्सच्या नेतृत्व खाली खेळेल.
दक्षिण आफ्रिकेची ताकद –
एक प्रतिभावान संघ – इंग्लंडला येण्या आगोदरच्या १६ सामन्यातील १४ सामान्यमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजय मिळाला आहे., ज्यात त्यानी ऑस्ट्रलिया आणि श्रीलंका संघ विरुद्ध निर्भेळ यश मिळवले होते. दक्षिण आफ्रिकाने २०१५ ते २०१७ मध्ये ७ मालिका जिंकल्या आहेत. दक्षिण आफ्रिका आता आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट संघांच्या यादीत पहिल्या कामंकावर आहे यामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.
अष्टपैलू खेळाडूंचा भरणा – दक्षिण आफ्रिकेकडे ५ अष्टपैलू खेळाडू आहेत, ज्यामुळे या संघात लवचिकता आहे. त्याच्याकडे असलेल्या पर्यायामुळे , खेळपट्टी आणि विरोधी संघ या दोन्हींचा विचार करून संघ मैदानात उतरवणे दक्षिण आफ्रिकेला सोपे जाईल.
भक्कम फलंदाजी – ए बी डिव्हिलर्स, डुप्लेसी, डुमिनी आणि आमला या पॉवर हाऊस फलंदाजीपुढे कुठलाही संघ गुढगे टेकेल.
दक्षिण आफ्रिका संघातील कमतरता
चोकर्स – १९९८ नंतर दक्षिण आफ्रिकेने कोणतीही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही त्यामुळे या संघाला मोठ्या स्पर्धेत जिंकण्याचा किंवा चांगली कामगिरी करण्याचा अनुभव नाही. तसेच चोकर्स हा टॅग घेऊन दक्षिण आफ्रिका या चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन खेळणार आहे. चोकर्स म्हणजे मोक्याच्या क्षणी सुमार खेळ करणारा संघ.
महास्पोर्ट्सची भविष्यवाणी – उपांत्यफेरी
ए बी डिव्हिलर्सच्या नेतृत्व खाली हा संघ किमान उपांत्य फेरीत तरी प्रवेश करेल असे दिसून येते. दक्षिण आफ्रिका अंडर डॉग म्हणून या स्पर्धेत जाईल .
दक्षिण आफ्रिकेचा संघ :
फलंदाज – आमला, डुप्लेसी, डिव्हिलर्स, मिलर, बेहदारीण
अष्टपैलू – डुमिनी, मॉरीस, फेहलूकवयो, प्रेट्रोरीस
यष्टीरक्षक – डिकॉक
फिरकी गोलंदाज – ताहीर, महाराज
वेगवान गोलंदाज – एम मॉर्केल, रबडा
दक्षिण आफ्रिकेचे सामने –
जून ३ दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, लंडन
जून ७ दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान, बर्मिंघम
जून ११ दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, लंडन