INDvsSA 3rd ODI: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना पार्ल येथील बोलँड पार्क येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 4.30 वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक दक्षिण आफ्रिका संघाने जिंकली असून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिका संघात कोणताही बदल झाला नाही. मात्र, भारतीय संघात दोन बदल आहेत. भारताकडून रजत पाटीदार (Rajat Patidar) या विस्फोटक फलंदाजाचे वनडे पदार्पण झाले आहे. तसेच, ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) संघातून बाहेर झाला आहे. याव्यतिरिक्त कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याला विश्रांती दिली असून वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याचे संघात पुनरागमन झाले आहे.
A look at #TeamIndia's Playing XI for the third and final ODI 👌👌
Rajat Patidar is set to make his ODI debut 👏👏
Follow the Match ▶️ https://t.co/nSIIL6gzER#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/3qHkp6M32u
— BCCI (@BCCI) December 21, 2023
दोन सामन्यांनंतर मालिका बरोबरीत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने 106 धावांनी जिंकला होता. मात्र, दुसऱ्या वनडेत यजमान दक्षिण आफ्रिकेने शानदार पुनरागमन करत सामना 8 विकेट्सने खिशात घातला. अशात दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. अशात मालिका नावावर करण्यासाठी दोन्ही संघ तिसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. (South Africa have won the toss and have opted to field against india INDvsSA 3rd ODI)
तिसऱ्या वनडेसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिका संघ-
टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम (कर्णधार), हेन्रीच क्लासेन (यष्टीरक्षक), डेविड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विलियम्स, ब्यूरन हेंड्रिक्स
भारतीय संघ-
केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), रजत पाटीदार, साई सुदर्शन, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार.
हेही वाचा-
‘मला कसलाही पश्चाताप नाही, उलट…’, 24.75 कोटींची बोली लागलेल्या स्टार्कचे 8 IPL हंगाम न खेळण्याविषयी भाष्य
Breaking: IPL लिलावात RCBमध्ये सामील झालेल्या स्टार खेळाडूवर 4 सामन्यांची बंदी, टी20 लीगमध्ये केली मोठी चूक