भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामना सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्कवर खेळला जात आहे. पहिल्या दिवसाखेर भारताची धावसंख्या 200 धावांपेक्षा जास्त होती. दुसऱ्या दिवशी भारतीय संघ पहिल्या सत्रात सर्वबाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेने भारतावर 11 धावांची आघाडी देखील घेतली. माजी कर्णधार डीन एल्गर याने कारकिर्दीतील 14वे शतक ठोकले.
भारती संघाने या सामन्यात नाणेफेग गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. पहिल्या दिवशी भारतीय संघाने 8 विकेट्सच्या नुकसानावर 208 धावांपर्यंत मजल मारली होती. केएल राहुल 70, तर मोहम्मद सिराज शुन्य धावावर असताना दुसऱ्या दिवसी भारताचा खेळ सुरू झाला. राहुलने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपले शतक पूर्ण केले. सेंच्युरियनमध्ये राहुलचे हे दुसरे कसोटी शतक ठरले. पहिल्या डावात भारताने 67.4 षटकांमध्ये भारताने 245 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीची संधी मिळाली. ऍडेन मार्करम 5, टोनी डी झोर्झी 28, कीगन पीटरसन 2 आणि काईल वेरेन 4 धावांवर विकेट्स गमावल्या. डेव्हिन बेडिंगहॅम याने 56 धावांची महत्वपूर्ण खेळी केली आणि मोहम्मद सिराजने त्याची विकेट घेतली. दुसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 66 षटकांमध्ये 5 विकेट्सच्या नुकसानावर 256 धावांपर्यंत पोहोचली. डीन एल्गर याने 211 चेंडूत सर्वाधिक 140* धावा कुटल्या. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एल्गरसोबत मार्को यान्सेन डावाची सुरुवात करेल, जो दुसऱ्या दिवसाखेर 3* धावांवर खेलत आहे.
Dean Elgar’s unbeaten ton has put South Africa in the driving seat in Centurion 👏
📝 #SAvIND: https://t.co/xSuVJrjWI9 | #WTC25 pic.twitter.com/p5An0tC7Sh
— ICC (@ICC) December 27, 2023
भारतासाठी जसप्रीत बुमराह याने आणि मोहम्मद सिराज प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णा यानेही एक विकेट्स घेतली. शार्दुल ठाकूर आणि रविचंद्रन अश्विन यांना अद्याप एकही विकेट मिळाली नाहीये. (South Africa lead at the end of the second day of the Boxing Day Test)
पहिल्या कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर, एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
महत्वाच्या बातम्या –
आर्या स्पोर्टस टी-20 क्रिकेट स्पर्धेत रॉयल पुरंदर संघाला पराभुत करून शांताराम बापू कटके संघाला विजेतेपद
IND vs SA: हर्शल गिब्स कर्णधार बावुमावर संतापला; म्हणाला, ‘तो लठ्ठ आणि अनफिट…’