दक्षिण आफ्रिका संघाचा दिग्गज माजी कर्णधार एबी डिविलियर्स याची गणना जगातील अव्वल खेळाडूंमध्ये होते. मैदानावर क्षेत्ररक्षण करणे असो किंवा यष्टीरक्षण करणे असो किंवा गोलंदाजांना आपल्या बॅटमधून चोप देणे असो, सर्व विभागांमध्ये डिविलियर्स चमकायचाच. त्याची गणना जगातील वादळी फलंदाजांमध्ये होते. कसोटी, वनडे आणि टी20 सर्व क्रिकेट प्रकारात तो गोलंदाजांचा सुफडा साफ करायचा. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी त्याने एकापेक्षा एक अशा खेळी खेळल्या आहेत. विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांची मैत्रीही कुणापासून लपलेली नाहीये. दोघांनी आरसीबीसाठी अनेक मोठ्या भागीदाऱ्या साकारल्या आहेत. मात्र, जेव्हा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू निवडण्याची वेळ आली, तेव्हा डिविलियर्सने चकित करणारे नाव निवडले.
कोण आहे टी20चा महान खेळाडू?
विराट कोहली (Virat Kohli) आयपीएल (IPL) स्पर्धेमध्ये सर्वाधिक 6411 धावा करणारा फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही तो 4000हून अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज आहे. आरसीबीसाठी खेळलेल्या ख्रिस गेल (Chris Gayle) हादेखील भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या नावावर टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 14562 धावा आहेत. त्याच्या बॅटमधून या क्रिकेट प्रकारात 175 धावांची वादळी खेळीही निघाली आहे. याव्यतिरिक्त असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत. मात्र, जेव्हा एबी डिविलियर्स (AB De Villiers) याला टी20चा महान खेळाडू कोण अशी विचारणा केली, तेव्हा त्याने भलत्याच खेळाडूचे नाव घेतले.
डिविलियर्सने अफगाणिस्तानचा राशिद खान (Rashid Khan) याचे नाव घेतले. त्याने एका मुलाखतीत म्हटले की, “माझ्यासाठी आतापर्यंतचा टी20चा महान खेळाडू इतर कुणी नसून राशिद खान आहे. तो बॅट आणि चेंडू दोन्हीमधून कमाल करतो. दोन्ही विभागात तो मॅचविनर आहे. तो मैदानात एक वाघाचं जिगर असलेला खेळाडू आहे. त्याला नेहमी विजय मिळवायचा असतो. तो टी20चा सर्वात महान खेळाडू नाहीये, तर महान खेळाडूंमधील एक गरज आहे.”
राशिद खानचा विक्रम
एबी डिविलियर्स ज्या राशिदला टी20चा महान खेळाडू म्हणतोय, तो राशिद जगातील जवळपास प्रत्येक टी20 लीगमध्ये खेळताना दिसतो. तसेच, तो आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये तिसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर 77 सामन्यात 126 विकेट्सचा विक्रम आहे. त्यातील 92 विकेट्स या बांगलादेश, आयर्लंड, यूएई आणि झिम्बाब्वे संघाविरुद्ध मिळाल्या आहेत. मोठ्या संघांमध्ये फक्त वेस्ट इंडिजविरुद्धच त्याने 5 पेक्षा अधिक सामने खेळले आहेत. (south africa legend ab de villiers pick rashid khan as greatest t20 player of all time)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जबरदस्त डाईव्ह मारत राधाने एका हातात पकडला अविश्वसनीय कॅच, पाहून दीप्तीलाही बसला शॉक, Video Viral
दिल्लीकडून पराभूत होताच यूपीची कर्णधार स्पष्टच बोलली; म्हणाली, ‘आमच्या पराभवाचं हेच मोठं कारण…’