मंगळवारी (१९ जुलै) दक्षिण आफ्रिका संघाने इंग्लंड दौऱ्यातील पहिला विजय मिळवला. उभय संघातील पहिल्या सामन्यात आफ्रिकी संघाने जयमान इंग्लंडला ६२ धावांनी पराभूत केले. दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ३३४ धावांचे लक्ष्य उभे केले. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकी संघाने एका खास विक्रमाची नोंद केली.
आफ्रिकी संघाने या सामन्यात केलेल्या ३३३ धावांमध्ये एकही षटकार मारला नाही, जी खूप मोठी कामगिरी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकी तिसरा संघ ठरला आहे, ज्यांनी एखाद्या सामन्यात एकही षटकार मारला नाही आणि ३०० पेक्षा मोठी धावसंख्या उभी केली. यापूर्वी अशी कामगिरी फक्त श्रीलंक आणि इंग्लंडने केली होती.
एकही षटकार न मारता सर्वात मोठी धावसंख्या करणाऱ्यांमध्ये श्रीलंका पहिल्या क्रमांकावर आहे. श्रीलंकन संघाने २०२० मध्ये हम्बलटोटमध्ये खेळलेल्या सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध ३४५ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये एकाही षटकाराचा समावेश नव्हता. त्यानंतर इंग्लंड अशी कामगिरी करणारा दुसरा संघ आहे. इंग्लंडने २०११ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात एकही षटकार न मारता ३३३ धावा केल्या होत्या. हा सामना सिडनीमध्ये खेळला गेला होता. आता या यादीत दक्षिण आफ्रिकी संघाचा समावेश झाला आहे. आफ्रिकी संघाने इंग्लंडविरुद्धचा हा सामना चेस्टर-ले-स्ट्रीट मध्ये खेळला.
एकही षटकार न मारतला सर्वात मोठी धावसंख्या करणारे संघ –
श्रीलंक – ३४५/५ (विरुद्ध वेस्ट इंडीज, हम्बलटोट – २०२०)
दक्षिण आफ्रिका – ३३३/५ (विरुद्ध इंग्लंड, चेस्टर-ले-स्ट्रीट – २०२२)
इंग्लंड – ३३३/६ (विरुद्ध ऑस्ट्रेलिया – २०११)
🚨 RESULT | SOUTH AFRICA WIN BY 62 RUNS
A solid collective effort by the bowling unit – led by Anrich Nortje (4/53) – backed up the efforts of the batters as the #Proteas dismiss England for 271 after setting the hosts a target of 334#ENGvSA #BePartOfIt pic.twitter.com/hegYbqKnKf
— Proteas Men (@ProteasMenCSA) July 19, 2022
उभय संघातील या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाठी रस्सी वॅन डर ड्यूसेनने सर्वात्तम प्रदर्शन केले आणि यासाठी त्याला सामनावीर निवडले गेले. ड्यूसेनने ११७ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने १३३ धावांची खेळी केली. तसेच एडन मार्करमने ९ चौकारांच्या मदतीने ७७ धावांची खेळी केली. प्रत्युत्तारत ३३४ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेला इंग्लंड संघ ४६.५ षटकात २७१ धावा करून सर्वबाद झाला. ड्यूसनने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिल्या ३० डावांमध्ये १४९८ धावांचा टप्पा गाठला आहे. या बाबतीत फक्त हाशिम आमला त्याच्या पुढे आहे, ज्याने स्वतःच्या पहिल्या ३० एकदिवसीय डावांमध्ये १५९१ धावा केल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘मी संघात असतो तर तीन वेळा…’, श्रीसंतने विराट कोहलीला विश्वचषकावरून हिणवले
लहानपणीच सुंदर खेळायचा लॅंकेशायरसाठी! नक्की काय होते हे प्रकरण
बाबो! आत्ताच भारत विरुद्ध पाकिस्ताच्या सामन्याची १२ लाख तिकीटे झालीत बुक, वाचा कधी रंगणार लढत