Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दक्षिण आफ्रिकेसाठी पाऊस पुन्हा विलन! झिम्बाब्वेच्या वेळकाढूपणामुळे सामना रद्द; डी कॉकची तुफान फलंदाजी

October 24, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/ICC

Photo Courtesy: Twitter/ICC


टी20 विश्वचषकात सोमवारी (24 ऑक्टोबर) ब गटातील दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वे (SAvZIM) या देशा दरम्यान सामना खेळला गेला. पावसामुळे निर्धारित वेळेपेक्षा तब्बल अडीच तास उशिराने सुरू झालेला हा सामना संपूर्णपणे पावसाच्या वातावरणातच खेळला गेला. 64 धावांचा पाठलाग करत असताना क्विंटन डी कॉकने आक्रमक फलंदाजी केली. मात्र, झिम्बाब्वेच्या संघाने दाखवलेल्या अखिलाडूवृत्तीने सामना रद्द करावा लागला.

Points shared with persistent rain in Hobart 🤝#SAvZIM | #T20WorldCup | 📝: https://t.co/D7bhRRb9Qa pic.twitter.com/Ktn0Sd7YRQ

— ICC (@ICC) October 24, 2022

 

पावसामुळे हा सामना होणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र, थोडीफार उघडीप मिळाल्यानंतर तब्बल अडीच तासाच्या प्रतीक्षेनंतर सामना प्रत्येकी 9 षटकांचा केला गेला. झिम्बाब्वे संघाने यापूर्वीच नाणेफेक जिंकल्याने त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. वेन पार्नेलने एर्विनच्या रूपाने झिम्बाब्वेला पहिला धक्का दिला. एन्गिडीने दुसऱ्या षटकात चकाब्वा व सिकंदर रझा एका पाठोपाठ बाद करत 12 धावांवर झिम्बाब्वेचे तीन गडी तंबूत धाडले. तर 19 धावांवर झिम्बाब्वेला चौथा धक्का बसला. मात्र त्यानंतर मधवेरेने 18 चेंडूंवर 4 चौकार व 1 षटकार ठोकत संघाला 9 षटकात 80 धावांवर नेऊन ठेवले. मिल्टन शुंबाने 18 धावांचे योगदान दिले.

सातत्याने पाऊस सुरू असल्याने दक्षिण आफ्रिकेला हे आव्हान लवकरात लवकर पार करणे गरजेचे होते. संघाचा अनुभवी सलामीवीर क्विंटन डी कॉकने ही जबाबदारी उचलत पहिल्या षटकात 23 धावा कुटल्या. दुसऱ्या षटकातही 17 धावा करत त्यांनी वेगाने विजयी लक्षाकडे आगेकूच केली. मात्र, पुन्हा एकदा पावसाच्या आगमन झाल्याने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 7 षटकात 64 धावांचे आव्हान दिले गेले. त्यानंतर झिम्बाब्वेने वेळ काढूपणा केल्याने केवळ एकच षटक पूर्ण झाले. अखेरीस दक्षिण आफ्रिकेने 3 षटकात 51 धावा केल्या असताना पावसाचे आगमन झाल्याने खेळ थांबवण्यात आला. पुन्हा खेळ सुरू न झाल्याने सामना रद्द करण्यात आला. डी कॉकने केवळ 18 चेंडूवर नाबाद 47 धावा चोपल्या. या सामन्यामुळे दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी एक गुण जमा केला गेला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पराभव पाकिस्तानचा झळ मात्र ऑस्ट्रेलियाला! भारताकडून 19 वर्ष जुना विश्वविक्रम मोडीत
शांत द्रविडचे भन्नाट सेलेब्रेशन! आयसीसीने शेयर केलायं व्हिडिओ, एकदा पाहाच


Next Post
Virat kohli v pak

अस कस घडल! विराट पाकची पिसे काढत असताना बिघडली भारताची अर्थव्यवस्था; वाचा संपूर्ण प्रकरण

Team-India

आशिया चषकापेक्षा टी-20 विश्वचषकात भारत-पाक सामना पाहणाऱ्यांची संख्या वाढली, मोडीत निघाले सर्व विक्रम

Photo Courtesy: Twitter/Pretoria Capitals

पावसाबरोबर क्विंटन डी कॉकही बरसला झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर! टी20 वर्ल्डकपचा 'बलाढ्य' रेकॉर्ड केला नावावर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143