युएई आणि ओमानमध्ये येत्या १७ ऑक्टोबर पासून टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. तसेच या स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी सर्वच संघ मजबूत संघासह मैदानात उतरणार आहेत. दरम्यान, गुरुवारी (९ सप्टेंबर) दक्षिण आफ्रिकेने देखील १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात अनेक मोठे बदल करण्यात आले आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सर्वच संघांनी मजबूत संघाची निवड केली आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकन संघातील अनुभवी खेळाडूंना आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी संधी देण्यात आलेली नाही. निवडकर्त्यांनी आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करताना अनुभवी खेळाडू फाफ डू प्लेसिस, इमरान ताहीर आणि ख्रिस मॉरिस यांना पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
नुकत्याच सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस याने गेल्या आठवड्यात ४ सप्टेंबर रोजी सेंट किट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात नाबाद १२० धावांची खेळी केली होती.
इमरान ताहीरने देखील कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना ८ सामन्यात ११ गडी बाद केले आहेत. तसेच तो सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी आहे. तरीदेखील त्याची टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली नाही. (South Africa squad for upcoming icc T20 world cup)
तसेच इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेसाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या ख्रिस मॉरिसला देखील या संघात स्थान देण्यात आले नाही. मॉरिस आपल्या आक्रमक गोलंदाजीसाठी आणि विस्फोटक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. यासह श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत सलामी फलंदाजीला येऊन शतक झळकावणाऱ्या जानेमन मलानला ही या संघात स्थान दिले गेले नाही.
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे दक्षिण आफ्रिकेचा १५ सदस्यीय संघ – टेंबा बावुमा (कर्णधार), केशव महाराज, क्विंटन डीकॉक, जॉन फॉर्टुइन, रिजा हेन्ड्रिक्स, हेनरिक क्लासेन, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, म्यूल्डर, लुंगी एन्गिडी, एन्रिच नॉर्किए, ड्वेन प्रीटोरियस, कागिसो रबाडा, तब्राईज शम्सी, रास्सी वॅन दर दुसेन.
राखीव खेळाडू – जॉर्ज लिंड, एंडिले फेहलुक्वायो, लिजाड विलियम्स.
महत्त्वाच्या बातम्या –
चार वर्षांनंतर भारताच्या टी२० संघातील अश्विनच्या निवडी मागचे खरे कारण आले समोर
लवकरच गांगुलीची ‘दादागिरी’ दिसणार रुपेरी पडद्यावर; ट्विट करत दिली खूशखबर