टी20 विश्वचषक 2022 मध्ये गुरूवारी (27 ऑक्टोबर) दक्षिण अफ्रीका आणि बांग्लादेश यांच्यात सिडनी येथे सामना खेळवला गेला. नाणेफेक जिंकून दक्षिण अफ्रीकेने फलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण अफ्रीकेची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर कर्णधार टेंबा बवूमा अवघ्या 2 धावा बनवून तंबूत परतला. मात्र, रीली रुसो आणि क्वींटन डीकॉक यांच्या धमाकेदार प्रदर्शनामुळे दक्षिण अफ्रीकाने 5 बाद 205 अशी धावसंख्या उभारली. त्याला उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांग्लादेशचा डाव 101 धावातचं गडगडला. दक्षिण अफ्रीका फलंदाजी करत असताना असं काही घडलं ज्यामुळे त्यांना 5 धावा फुकट मिळून गेल्या. बांग्लादेशने क्षेत्ररक्षण करताना केलेल्या या चुकीची त्यांना चांगलीच अद्दल घडली. दक्षिण अफ्रीकेच्या संघाला अतिरीक्त 5 धावा मिळाल्या.
बांग्लादेशचा कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) संघासाठी 11 वे षटक टाकण्यासाठी आला. त्याने आपल्या षटकाच्या पहिल्या 5 चेंडूंवर 21 धावा दिल्या आणि याशिवाय दक्षिण अफ्रीकेला 5 धावा अतिरीक्त स्वरुपात मिळाल्या. बांग्लादेशच्या यष्टीरक्षकाने एक मोठी चुक केली आणि त्याचा तोटा पूर्ण संघाला सोसावा लागला.
यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे दक्षिण अफ्रीकेला मिळाल्या अतिरीक्त 5 धावा –
शाकिब अल हसन जेव्हा आपल्या षटकाचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी जसा पुढे आला तसा बांग्लादेशचा यष्टीरक्षक नुरूल हसन (Nurul Hasan) स्टंप्सच्या मागून एका बाजूला झाला. यामुळे मैदानावरील पंचांनी एकमेकांमध्ये चर्चा करत बांग्लादेशवर 5 धावांचा दंड ठोठवला. नियम असा आहे की जोपर्यंत गोलंदाज चेंडू पूर्णपणे फेकत नाही तोपर्यंत यष्टीरक्षक आपली जागा सोडू शकत नाही.
याआधी झिम्बाब्वे विरोधात खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण अफ्रीकेवर देखील 5 धावांचा दंड लावण्यात आला होता. त्यावेळी
थर्डमॅनवरून एक थ्रो यष्टीरक्षक क्वींटन डी कॉकच्या ग्लोव्जवर लागला. डी कॉकचा ग्लोव्ज जमीनीवर ठेवलेला होता आणि हा थ्रो जाऊन ग्लोव्जवरच लागला. त्यामुळे झिम्बाब्वे संघाला 5 धावा अतिरीक्त मिळाल्या. मात्र, यावेळी दक्षिण अफ्रीकेला याचा फायदा झाला आहे. या सामन्यात दक्षिण अफ्रीकेतर्फे रीली रूसो याने विस्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन केलं आणि शानदार शतक लगावले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
खरा ‘रनमशीन’ रोहितच! टी20 सामना जिंकताना त्यानेच चोपल्यात सर्वाधिक धावा, पाहा विराट कुठल्या स्थानी
पाकिस्तानची नाचक्की! झिम्बाब्वेने थरारक सामन्यात चारली धूळ; विश्वचषकातून बाहेर पडण्याची शक्यता