---Advertisement---

हे काय नवीन! इंग्लंडची फलंदाज गर्रकन फिरली अन् उलटा शॉट मारत झाली आऊट; व्हिडिओ ठरतोय लक्षवेधी

Nat-Sciver
---Advertisement---

महिला विश्वचषक २०२२ (Womens World Cup 2022) सध्या न्यूझीलंडमध्ये खेळला जात आहे. विश्वचषकाचा सोमवारी (१४ मार्च) १३ वा सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (South africa vs England) संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंड संघाची फलंदाज नेट शिवरने ज्या पद्धतीने बाद झाली तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंग्लंडच्या या धडाकेबाज महिला फलंदाजाला विचित्र पद्धतीने बाद होताना पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले.

इंग्लंडने १२ व्या षटकात नेट शिवरची (Nat Sciver) विकेट गमावली. आफ्रिकेची वेगवान गोलंदाज मसाबाता क्लासचा चेंडू शिवरने पुल करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान चेंडू तिच्या डाव्या बाजूच्या थायपॅडच्या वर लागला. शिवर शाॅट मारताना बॅटबरोबरच फिरली. चेंडू तिच्या बॅटच्या मागच्या भागात लागला आणि मागे उभी असलेल्या लिजलीच्या हातात गेला. क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या विकेट खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात. यावेळी शिवर वेगळ्याच लयमध्ये पाहायला मिळाली. तिने ३ चौकारांच्या मदतीने १६ धावा केल्या, परंतु तिची विकेट पडली.

नेट शिवरचा एवढ्या लवकर बाद होण्यामुळे संघाचे नुकसान झाले. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५० षटकात २३५ धावा केल्या. ब्यूमॉन्टने 62 आणि यष्टीरक्षक एमी जोंसने 53 धावांची खेळी खेळली. मारिजानने १० षटकात ४५ धावा देत ५ विकेट घेतल्या, तर क्लासने २ आणि खाकाने १ विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाची सलामीवीर फलंदाज लिजली फक्त ९ धावा करून तंबूत परतली. परंतु लॉरा वॉलवर्ड्ट आणि ताजमिन ब्रिट्स यांनी ५६ धावांची महत्वपूर्ण भागीदारी साकारली.

दक्षिण अफ्रिकेची मारिजान कॅपला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. तिने सामन्यात एकूण १० षटके गोलंदाजी केली आणि यामध्ये ४५ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. या अष्टपैलू खेळाडूने दक्षिण आफ्रिका संघासाठी ३२ धावा सुद्धा केल्या. तिच्या अप्रतिम खेळीनंतर तिचे कौतुक केले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पीवायसी रिबाउंड रॅकेट लीग २०२२ स्पर्धेत तलवार्स संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

मिताली अन् कंपनीची विश्वचषक पटकावण्याची तयारी; बलाढ्य संघांना प्रत्यक्षात पाहण्यासाठी लावली हजेरी

आर अश्विनचा डेल स्टेनला ‘४४०’चा झटका, अद्वितीय कारकिर्दीत जोडली आणखी एक सोनेरी किनार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---