पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत पंडित जावडेकर तलवार्स, एक्स्कॅलिबर्स्, मस्कीटर्स, समुराईज या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पंडित जावडेकर तलवार्स संघाने समुराईज संघाचा 576-542 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. टेनिस प्रकारात पंडित जावडेकर तलवार्स संघाला समुराईज संघाकडून 125 – 178 असा पराभवाचा सामना करावा लागला. पण त्यानंतर टेबल टेनिस प्रकारात रोहन छाजेड, रोहन पाठक, रोहन जमेनीस, मनिष शहा, अंकित दामले, आर्या देवधर, ईशान भाले, अविनाश दोशी, गिरीष मुजूमदार, अक्षय ओक यांच्या विजयी खेळीच्या जोरावर तलवार्स संघाने समुराईज संघाचा 230-182 असा पराभव करून हि आघाडी भरून काढली. बॅडमिंटन प्रकारात अंकित दामले, तेजस किंजवडेकर, आर्य देवधर , मकरंद चितळे, मिहिर आपटे, अविनाश दोशी,ईशान भाले, प्रशांत वैद्य, राहूल पाठक, वेदांत खटोड, मनिष शहा, हरिष अय्यर यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर तलवार्स संघाने समुराईज संघाचा 221-186 अशा फरकाने पराभव करून विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
पंडित जावडेकर तलवार्स वि वि समुराईज 576-542
टेनिस- तलवार्स पराभूत. वि समुराईज 125 – 178(रोहन जमिनीस/रोहन छाजेड पराभूत वि अमित नाटेकर/अवनी गोसावी 22-30, शिव जावडेकर/तेजस किंजवडेकर वि. वि नकुल फिरोदिया/निशांत बनगे 30-28, कुणाल बुरड/शरयू राव पराभूत वि अमित महाजनी/ राहुल गांगल 4-30, अंकित दामले/अवनी क्षीरसागर पराभूत वि आदित्य अभ्यंकर/सौरभ चिंचणकर 23-30, राहुल पाठक/मकरंद चितळे पराभूत वि विमल हंसराज/चारू साठे 11-30, ईशान भले/आर्य देवधर पराभूत वि शारदा बापट/यश शहा 15-20, अक्षय ओक/प्रशांत वैद्य वि. वि सचिन बेलगलकर/आनंद घाटे 20-10)
टेबल टेनिस- तलवार्स वि वि समुराईज 230-182(रोहन छाजेड/रोहन पाठक वि.वि आशिष बोडस/आदित्य अभ्यंकर 30-18, शिल्पा पांडे/कौस्तूभ देशपांडे पराभूत वि सचिन बेलगलकर/नितीन कोंकर 26-30, तेजस किंजवडेकर/कुणाल भुरट पराभूत वि. अमित नाटेकर/आनंद घाटे 28-30, रोहन जमेनीस/मनिष शहा वि.वि विनित रूकारी/सौरभ चिंचणकर 30-20, मकरंद चितळे/प्रशांत वैद्य पराभूत वि राहूल गांगल/आशुतोष सोमण 26-30, अंकित दामले/आर्या देवधर वि.वि अमित महाजनी/शारदा बापट 30-17, ईशान भाले/अविनाश दोशी वि.वि निशांत बनगे/विजय राठी 30-20, गिरीष मुजूमदार/अक्षय ओक वि.वि हेमंत पालांडे/आकाश सुर्यवंशी 20-17)
बॅडमिंटन- तलवार्स वि वि समुराईज 221-186(अंकित दामले/तेजस किंजवडेकर वि.वि कुणाल पाटील/आकाश सुर्यवंशी 30-16, आर्य देवधर /मकरंद चितळे वि.वि नितीन कोंकर/विनीत रूकारी 30-17, मिहिर आपटे/अविनाश दोशी वि.वि अमर श्रॉफ/अनिकेत सहस्त्रबुध्दे 30-26, गिरीष मुजूमदार/अक्षय ओक पराभूत वि विमल हंसराज/आनंद घाटे 25-30, ईशान भाले/प्रशांत वैद्य वि.वि अमित नाटेकर/हेमंत पालांडे 30-25, राहूल पाठक/वेदांत खटोड वि.वि निशांत भनगे/विजय राठी 30-18, मनिष शहा/हरिष अय्यर वि.वि जयकांत वैद्य/आदित्य अभ्यंकर 30-24, पोहन जमिनीस/शरयू राव पराभूत वि यश काळे/यश शहा 16-30)
महत्त्वाच्या बातम्या-
मिताली अन् कंपनीची विश्वचषक पटकावण्याची तयारी; बलाढ्य संघांना प्रत्यक्षात पाहण्यासाठी लावली हजेरी
झारखंडचा युवा शिलेदार चमकला, रणजी ट्रॉफी प्री-क्वार्टर फायनलमध्ये २६६ धावा करत इतिहास रचला