रविवारी (दि. १२ जून) भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात पराभवाचा धक्का बसला. ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना दक्षिण आफ्रिका संघाने ४ विकेट्सने काबीज केला. या सामन्यात विजय मिळवत दक्षिण आफ्रिका संघाने मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. त्यांच्या विजयाचा शिल्पकार हेन्रीच क्लासेन ठरला. त्याने ८१ धावांची तुफानी अर्धशतकी खेळी केली.
या सामन्यात नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या भारतीय (India) संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १४८ धावा चोपल्या होत्या. हे आव्हान दक्षिण आफ्रिका संघाने १८.२ षटकात ६ विकेट्स गमावत पूर्ण केले आणि सामना खिशात घातला.
South Africa win the 2nd T20I by 4 wickets and are now 2-0 up in the five match series.
Scorecard – https://t.co/pkuUUB966c #INDvSA @Paytm pic.twitter.com/fwlCeXouOM
— BCCI (@BCCI) June 12, 2022
दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना हेन्रीच क्लासेन याने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने यावेळी फलंदाजी करताना ४६ चेंडूत ८१ धावांचा पाऊस पाडला. या धावा करताना त्याने ५ षटकार आणि ७ चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार तेंबा बावुमा याने ३५ धावा आणि डेविड मिलर याने नाबाद २० धावांचे योगदान दिले. इतर एकाही फलंदाजाला २ आकडी धावसंख्या करता आली नाही. मात्र, त्याचा काही फरक संघाला पडला नाही. क्लासेनच्या अर्धशतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने सहज विजय मिळवला.
यावेळी भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमार फायदेशीर ठरला. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना फक्त १३ धावा दिल्या आणि सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एका विकेटवर समाधान मानावे लागले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून श्रेयस अय्यर याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३५ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४० धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त इशान किशन याने ३४ आणि दिनेश कार्तिक याने ३० धावांचे योगदान दिले. मात्र, इतर एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही. त्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. या अपयशामुळे बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाने भारताचे आव्हान सहजरीत्या पार केले.
यावेळी दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना एन्रीच नॉर्किया याने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३६ धावा दिल्या. त्याच्याव्यतिरिक्त कागिसो रबाडा, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी एका विकेटवर आपले नाव नोंदवले.
भारतीय संघातील पुढील सामना १४ जून रोजी विशाखापट्टणम येथे पार पडणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या माजी दिग्गजाला भेटण्यासाठी ‘द वॉल’ने काढला वेळ, Photo Viral
कमाईच्या बाबतीत आयपीएल देतंय थेट इंग्लिश प्रीमियर लीगला टक्कर, खुद्द दादांनीच केले स्पष्ट
धोनीचा ‘हा’ विक्रम मोडण्याची डी कॉकची सुवर्णसंधी हुकली, दुसऱ्या टी२०मधून बाहेर