---Advertisement---

भारताचा राग न्यूझीलंडवर काढला! दक्षिण आफ्रिकेने 9 विकेट्सने मारलं मैदान

On: सोमवार, ऑक्टोबर 17, 2022 6:07 PM
South-Africa
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत सध्या पहिल्या फेरीतील आणि सराव सामने सुरू आहेत. यामध्ये सोमवारी (दि. 17 ऑक्टोबर) न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सराव सामना पार पडला. ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला 9 विकेट्सने पराभूत केले. या विजयात दक्षिण आफ्रिका संघाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी मोलाचा वाटा उचलला. या विजयासह त्यांनी दाखवून दिले की, ते या विश्वचषकात बलाढ्य संघाला पराभूत करू शकतात.

या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंड (New Zealand) संघाला फार मोठी धावसंख्या उभारता आली नाही. 17.1 षटकातच 98 धावा करत त्यांचा आख्खा संघ तंबूत परतला. हे आव्हान दक्षिण आफ्रिका संघाने 11.2 षटकात फक्त 1 विकेट गमावत पूर्ण केले आणि विजय मिळवला.

दक्षिण आफ्रिका संघाकडून फलंदाजी करताना सलामीवीर रायली रूसो (Rilee Rossouw) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 32 चेंडूत नाबाद 54 धावा करत अर्धशतक झळकावले. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 9 चौकारही मारले. त्याच्यासोबत एडेन मार्करम (Aiden Markram) हादेखील 16 धावांवर नाबाद राहिला. तसेच, सलामीला उतरलेला रीझा हेंड्रिक्स याने 27 धावांचे योगदान दिले. या तिघांनी संघाला विजय मिळवून देण्यात मोठे योगदान दिले. यावेळी न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना इश सोधी याला फक्त एक विकेट घेण्यात यश आले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाकडून मार्टिन गप्टिल (Martin Guptill) याने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने 26 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त ग्लेन फिलिप्स (20) आणि मायकल ब्रेसवेल (11) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला एकाही फलंदाजाला दोन आखडी धावसंख्या उभारता आली नाही.

यावेळी दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करण्यासाठी तब्बल 8 खेळाडूंना पाचारण करण्यात आले. यामध्ये कर्णधार केशव महाराज (Keshav Maharaj) याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त वेन पार्नेल आणि तबरेज शम्सी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर मार्को यान्सेन, एडेन मार्करम आणि कागिसो रबाडा याने प्रत्येकी 1 विकेट आपल्या नावावर केली.

भारताविरुद्ध गमावलेली मालिका
विशेष म्हणजे, यापूर्वी भारत दौऱ्यावर गेलेल्या दक्षिण आफ्रिकेला 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-1ने पराभवाचा धक्का बसला होता. यानंतर आता न्यूझीलंडविरुद्ध मिळवलेला विजय त्यांना कुठेतरी सुखावणारा ठरला आहे. आता आगामी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका कशाप्रकारे कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर मॅथ्यू वेडने चूक कबूल केलीच; म्हणाला, ‘जेव्हा मी रिप्ले पाहिला…’
भारताचा सामना करण्यापूर्वीच पाकिस्तानच्या येतात नाकी नऊ? कर्णधार बाबर म्हणाला, ‘रोहितला…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---