विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात, न्यूझीलंड संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या डेवोन कॉनवेने तुफानी द्विशतक झळकावले आहे. या खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये जोरदार एन्ट्री केली आहे.परंतु अनेकांना याची कल्पना ही नसेल की, डेवोन कॉनवेचे बालपण न्यूझीलंड मध्ये नव्हे तर दक्षिण आफ्रिकेत गेले आहे. परंतु त्याला संधी मिळत नसल्याने त्याने न्यूझीलंडला जाण्याचा निर्णय घेतला होता. डेवोन कॉनवेच नव्हे तर असे आणखी काही क्रिकेटपटू आहेत. ज्यांनी क्रिकेट खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका सोडून दुसऱ्या देशात स्थलांतर केले होते.
१)डेवोन कॉनवे : न्यूझीलंड संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या डेवोन कॉनवेचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला आहे. त्याचे बालपण देखील दक्षिण आफ्रिकेत गेले आहे. इथेच त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. परंतु संघात स्थान मिळत नसल्याने त्याने न्यूझीलंडला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला होता. डेवोन कॉनवेने न्यूझीलंड संघासाठी टी -२० आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच आता त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ही आपली छाप सोडायला सुरुवात केली आहे.पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकवत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये जोरदार एन्ट्री केली आहे.
२) जेसन रॉय : इंग्लंड संघाचा आक्रमक फलंदाज, जेसन रॉय याचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील डर्बन मध्ये झाला आहे. परंतु वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी जेसन रॉय इंग्लंडमध्ये स्थलांतरित झाला होता. रॉयने इंग्लंड संघासाठी एकूण ९६ वनडे आणि ४३ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. इंग्लंड संघाला विश्वचषक २०१९ स्पर्धेत विजय मिळवून देण्यात रॉयने मोलाची भूमिका बजावली होती.
३) जोनाथन ट्रॉट : जोनाथन ट्रॉटचा जन्म, दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये झाला होता. परंतु त्याने इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. ट्रॉटचे वडील मूळचे इंग्लंडचे होते तर त्याची आई दक्षिण आफ्रिकेतील होती. ट्रॉटने दक्षिण आफ्रिकेच्या अंडर -१५ आणि अंडर -१९ संघात स्थान मिळवले होते.परंतु हे सर्व सोडून त्याने इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याने इंग्लंड संघासाठी ५२ कसोटी, ६८ वनडे आणि ७ टी -२० सामने खेळले आहेत.
४) कीटन जेनिंग्स : इंग्लंड संघातील डाव्या हाताचा फलंदाज, कीटन जेनिंग्स याने २०१६ मध्ये भारतीय संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने इंग्लंड संघासाठी एकूण १७ कसोटी सामने खेळले आहेत. कीटन जेनिंग्सचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग मध्ये झाला होता. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या अंडर १९ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
५) निक कॉम्प्टन : इंग्लंड संघासाठी १६ कसोटी सामने खेळणाऱ्या निक कॉम्प्टनचा जन्मही दक्षिण आफ्रिकेतील डर्बन मध्ये झाला होता. आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, निक कॉम्प्टन इंग्लंडला स्थलांतरित झाला होता. कॉम्प्टनने देखील आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय संघाविरुद्ध केली होती.
६) स्टुअर्ट मीकर : स्टुअर्ट मीकरचा जन्म देखील दक्षिण आफ्रिकेतील नेटाल मध्ये झाला आहे. त्यानंतर तो इंग्लंड मध्ये स्थलांतरित झाला होता. मीकरने भारतीय संघाविरुद्ध २ वनडे आणि २ टी -२० सामने खेळले आहेत. त्याने विराट कोहलीला २ वेळेस बाद केले आहे.
७) जेड डर्नबाक : इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जेड डर्नबाक याचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग मध्ये झाला आहे. जेड डर्नबाकने इंग्लंड संघासाठी २४ वनडे आणि ३४ टी -२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला ७० गडी बाद करण्यात यश आले आहे.
८) मार्नस लाबुशेन : ऑस्ट्रेलियन संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज मार्नस लाबुशेन याचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील, नॉर्थ वेस्ट प्रोविंस मध्ये झाला आहे.तो लहानपणीच ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतरित झाला होता. लाबुशेनने ऑस्ट्रेलिया संघासाठी एकूण १८ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला ५ शतक करण्यात यश आले आहे.
९) ग्लेन फिलिप्स : न्यूझीलंड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ग्लेन फिलिप्स याचा जन्म देखील दक्षिण आफ्रिकेत झाला आहे. त्याचा जन्म ईस्ट लंडन मध्ये झाला आहे. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी तो न्यूझीलंड मध्ये स्थलांतरित झाला होता.
१०) नील वॅगनर : न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज नील वॅगनरचा जन्म देखील दक्षिण आफ्रिकेत झाला आहे. दोन कसोटी सामन्यात तो दक्षिण आफ्रिकन संघाचा १२ वा खेळाडू होता. त्याला या संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. म्हणून त्याने न्यूझीलंड स्मघसठी खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्याने २०१२ मध्ये न्यूझीलंड संघासाठी पदार्पण केले होते.
११) मॉर्ने मॉर्कल : दक्षिण आफ्रिकन संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०९ गडी बाद करणाऱ्या मॉर्ने मॉर्कलने दक्षिण आफ्रिका सोडून ऑस्ट्रेलिया मध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडला पोहोचताच स्मृती मंधानाच्या वेळापत्रकात होतो हा महत्वाचा बदल
भारतीय संघासाठी आनंदाची बातमी! लॉर्डस कसोटीत दिसून आली न्यूझीलंडची ही कमजोरी
आयपीएल नाहीतर ही लीग सर्वोत्तम, आंद्रे रसेलचे धक्कादायक विधान