आयपीएल 2025च्या मेगा लिलावात (IPM Mega Auction) मार्को जॅन्सनला (Marco Jansen) पंजाब किंग्जने (Punjab Kings) नुकतेच विकत घेतले आहे. पंजाबने लिलावात त्याला 7 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील केले. जॅन्सन दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज आहे. लिलावानंतर त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिका विरूद्ध श्रीलंका (South Africa vs Sri Lanka) संघात डर्बनमध्ये सुरू असलेल्या सामन्याच्या पहिल्या डावात जॅन्सनने 7 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंका संघ ढेपाळला.
सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद 191 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. धनंजया डी सिल्वाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात अवघ्या 42 धावांवर सर्वबाद झाला. यादरम्यान मार्को जॅन्सनने भेदक गोलंदाजीचा मारा केला. त्याने 6.5 षटकात केवळ 13 धावा देत 7 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
आयपीएल 2025च्या मेगा लिलावात मार्को जॅन्सनला (Marco Jansen) मूळ किमतीपेक्षा कितीतरी पट अधिक पैसे मिळाले. त्याची मूळ किंमत 1.25 कोटी रुपये होती. पण पंजाबने त्याला 7 कोटींना विकत घेतले. जॅन्सनवर पहिली बोली मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) लावली होती. यानंतर पंजाबही या शर्यतीत सामील झाले. मुंबईने 2.40 कोटींची शेवटची बोली लावली. यानंतर गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) बोली लावली. गुजरातने 6.75 कोटी रूपयांची शेवटची बोली लावली. नंतर पंजाबने बाजी मारत जॅन्सनला आपल्या ताफ्यात सामील केले.
𝐀𝐚𝐭𝐞 𝐡𝐢 𝐤𝐚𝐚𝐦 𝐬𝐡𝐮𝐫𝐮 𝐤𝐚𝐫 𝐝𝐢𝐲𝐞! 🔥
Big Jansen making a 𝐌𝐚𝐫𝐜 against 🇱🇰.#MarcoJansen #SAvsSL #PunjabKings pic.twitter.com/5Xu2nht6zF
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) November 28, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
IPL Mega Auction; यूपीचे ‘हे’ 8 क्रिकेटर लिलावात झाले मालामाल
ICC Champions Trophy; पाकिस्तानच्या जिद्दीमुळे आयसीसीचे होणार भारी नुकसान?
“11 अविश्वसनीय वर्षांनंतर….”, हैदराबादपासून वेगळे झाल्यानंतर भुवनेश्वर कुमारची भावुक पोस्ट