कोव्हिड-19 या साथीच्या आजाराने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे सर्व खबरदारी घेत जैव सुरक्षित वातावरणात क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र सर्व काळजी घेऊनही काही खेळाडूंना या रोगाची लागण झाल्याचा बातम्या समोर येत आहेत.
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 27 नोव्हेंबर पासून मर्यादित षटकांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.त्याआधी दक्षिण आफ्रिकेच्या एका क्रिकेटपटूचा कोव्हिड-19 चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्याशी जवळीक साधलेल्या आणखी दोन खेळाडूंनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
या तिन्ही क्रिकेटपटूंची नावे उघड करण्यात आलेली नाही, क्रिकेट साऊथ आफ्रिका यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “वैद्यकीय पथकाद्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे आणि त्यांचे परीक्षण केले जात आहे.”
“जोखीम मूल्यांकनानुसार दोन खेळाडू पॉझिटिव्ह आलेल्या खेळाडूच्या अधिक संपर्कात असल्यामुळे त्यांनाही क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. कोव्हिड-19 च्या प्रोटोकॉलचा भाग म्हणून या तिन्ही खेळाडूंना केप टाऊनमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. या खेळाडूंमध्ये कोव्हिड-19 ची लक्षणे आढळली नाहीत, तरी त्यांचे उत्तम आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी सीएसएचे वैद्यकीय पथक त्यांची काळजी घेणार आहे, ”असे सीएसएने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
ज्या खेळाडूंना क्वारंटाईनमध्ये ठेवले गेले आहे, त्यांच्या जागेवर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी इतर कोणालाही संघात स्थान दिले जाणार नाही. मात्र दोन अतिरिक्त खेळाडू संघात सामील होतील, असे सीएसएने स्पष्टीकरण दिले आहे.
“इंग्लंडविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या दौर्यासाठी केपटाऊनमधील जैव-सुरक्षित वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्यांवर अंदाजे 50 कोव्हिड-19 पीसीआर चाचण्या घेण्यात आल्या. तपासणी करण्याच्या उद्देशाने कोरोना विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.” असेही सीएसएने सांगितले.
दक्षिण आफ्रिकेत दाखल झालेल्या इंग्लंड संघातील प्रत्येकाची कोव्हिड-19 चाचणी नकारात्मक आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीचे मोठे मन! महाराष्ट्रातील दहा हजार कुपोषित मुलांच्या मदतीसाठी केला हात पुढे
चेन्नईच ट्विटर किंग्ज! आयपीएलमधील खराब कामगिरी नंतरही धोनीची CSK ‘या’ बाबतीत अव्वल
…तर ऑस्ट्रेलियात पुजारा करु शकतो नवा रेकॉर्ड; तेंडुलकर, गांगुली, कोहलीच्या पंक्तीत बसण्याची संधी
ट्रेंडिंग लेख –
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी