दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक फाफ डू प्लेसिस ३ महिन्याच्या दुखापतीनंतर पुन्हा मैदानात उतरला आहे. डू प्लेसिस सध्या कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये (सीपीएल) सेंट लुसिया किंग्स या संघाचे नेतृत्व करत आहे. यातच आता डू प्लेसिससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
डू प्लेसिसला यंदाच्या अबुधाबी टी-१० क्रिकेट स्पर्धेत बांग्ला टायगर्सचा आयकॉन (संघाचा चेहरा) आणि कर्णधार देखील बनवण्यात आले आहे. यावर डू प्लेसिसने आनंद देखील व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदची (आयसीसी) आधिकारिक परवानगी घेऊन यूएई क्रिकेट बोर्ड या टी-१० स्पर्धेचे आयोजन करते. या वर्षी ही स्पर्धा अबुधाबीच्या ‘जायद क्रिकेट स्टेडियम’मध्ये खेळविण्यात येणार आहे.
याबाबत डू प्लेसिस म्हणाला, “क्रिकेटसाठी ही अत्यंत उत्कृष्ट वेळ आहे. टी-१० सारखी स्पर्धा क्रिकेट रसिकांचे ज्याप्रकारे मनोरंजन करते. ते पाहणे अत्यंत सुखदायक वाटते.”
डू प्लेसिसने दक्षिण आफ्रिका संघाकडून खेळताना आतापर्यंत एकूण ६९ कसोटी सामन्यात ४०.०२ च्या सरासरीने ४१६३ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये १० शतक आणि २१ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच १४३ एकदिवसीय सामन्यांमध्ये डु प्लेसिसने ४७.४७ च्या सरासरीने ५५०७ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने १२ शतके आणि ३५ अर्धशतके ठोकले आहेत. तर टी-२० सामन्यात १३४ च्या स्ट्राइक रेटने डू प्लेसिसने १ शतक आणि १० अर्धशतकांच्या मदतीने १५२८ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याची सरासरी ३५.५३ एवढी आहे.
दरम्यान फॅफ डू प्लेसिस पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाकडून खेळताना क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला तब्बल ३ महिन्यांची विश्रांती घ्यावी लागली. यानंतर त्याने मैदानात पुन्हा पुनरागमन केले. डू प्लेसिस सध्या सुरू असलेल्या सीपीएलमध्ये सेंट लुसिया किंग्स संघाचे कर्णधापद भूषवत आहे. यानंतर तो लवकरच आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नई सुपर किंग संघाकडून खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–गावसकरांनी चौथ्या कसोटीच अतिरिक्त फलंदाज खेळवण्याचा दिल्ला सल्ला, पण विराट म्हणाला…
–वाढदिवस विशेष : विराट नसता तर बद्रीनाथ असता
–गरजू खेळाडूंना प्रारंभीच्या काळात आर्थिक मदत करा – तेजस्विनी सावंत






