---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज वर्नोन फिलँडरचा क्रिकेटला अलविदा!

On: मंगळवार, जानेवारी 28, 2020 5:16 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वर्नोन फिलँडर इंग्लंड विरुद्ध 24 ते 27 जानेवारी दरम्यान कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळला. या सामन्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

34 वर्षीय फिलँडरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 101 सामने खेळले. यामध्ये 64 कसोटी, 30 वनडे आणि 7 टी20 सामन्यांचा समावेळ आहे. त्याने कसोटीमध्ये 224 विकेट्स, वनडेत 41 विकेट्स आणि टी20मध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने एकूण 1944 धावा केल्या आहेत.

फिलँडरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2007 ला जोहान्सबर्ग येथे वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या टी20 सामन्यातून पदार्पण केले होते. या सामन्यात फिलँडरने 2 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता.

मात्र त्याच्या निवृत्तीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला त्याला विजयी निरोप देण्यात अपयश आले. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंड विरुद्धचा चौथा कसोटी सामना 191 धावांनी गमावत कसोटी मालिकाही 1-3 अशी फरकाने गमावली.

या सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिस फिलँडरबद्दल म्हणाला, ‘दक्षिण आफ्रिकेची जी सेवा वर्नोनने केली, त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो. आम्ही त्याच्याबरोबर आज रात्री ड्रेसिंगरुममध्ये बसू आणि आठवणींना उजाळा देऊ. गेल्या 10 वर्षातील तूझा प्रवास शानदार होता. यासाठी तू मेहनत घेतलीस, वेळ दिलास आणि त्यागही केलास.’

फिलँडरने त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात 2 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे याच सामन्यात त्याने जॉस बटलर बाद केल्यानंतर काही अपशब्द वापरत सेलिब्रेश केल्याने त्याला आयसीसीने सामनाशुल्काच्या 15 टक्के दंड आणि 1 डिमिरिट पाॅइंट अशी शिक्षाही सुनावली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---