---Advertisement---

दक्षिण आशियाई स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाला दुहेरी सुवर्णमुकुट

On: सोमवार, डिसेंबर 9, 2019 4:39 PM
---Advertisement---

नेपाळमध्ये सुरू असलेल्या १३ व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत आज कबड्डीचे अंतिम सामने पार पडले. पुरुष व महिला दोन्ही गटात भारतीय संघाने वर्चस्व राखत सुवर्णपदक पटकावले. एपीएफ हॉल, हॉलचॉक, काठमांडू येथे पुरुष व महिला गटाचे कबड्डी सामने पार पडले.

महिला गटात भारत विरुद्ध यजमान नेपाळ यांच्यात अंतिम सामना रंगला. मध्यंतरापर्यत १४-१० अशी अवघ्या ४ गुणांची आघाडी भारताकडे होती. परंतु उत्तरार्धात भारतीय संघाने आक्रमक खेळ करत ५०-१३ असा एकतर्फी विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले.

भारताकडून चढाईत सोनाली शिंगटे, पुष्पा, साक्षी कुमारी यांनी उत्कृष्ट खेळ केला. तर दीपिका जोशेप, प्रियांका, रितू नेगी यांनी उत्कृष्ट पकडीचा नमुना दाखवला.

पुरुष गटात भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात अंतिम लढत झाली. भारतीय संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत २८-११ अशी मध्यंतरापर्यत आघाडी घेतली होती. पवन कुमार शेरावत, नवीन कुमार यांनी आक्रमक चढाई करत भारताला आघाडी मिळून दिली. तर पकडीत नितेश कुमार, परवेश, विशाल भारद्वाज यांनी चांगला खेळ केला. भारताने ५१-१८ असा श्रीलंका संघाचा धुव्वा उडवत सुवर्णपदक पटकावले.

https://twitter.com/Maha_Sports/status/1203947437863231494

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---