दुलीप ट्रॉफी 2023चे विजेतेपद हनुमा विहारी याच्या नेतृत्वातील साऊथ झोन संघाने जिंकले. अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर वेस्ट झोनचे आव्हान होते. सामन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणझेच रविवारी (16 जुलै) पहिल्याच सत्रात साऊथ झोनने 75 धावांनी विजेतेपद पटकावले. वेस्ट झोन संघाने विजयासाठी शेवटच्या डावात 298 धावा हव्या होत्या. पण त्यांचा संघ 84.2 षटकात 222 धावांवर गुंडाळला गेला. बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या हस्ते त्यांनी 2023 दुलीप ट्रॉफी मिळाली. विद्वथ कवेरप्पा सामनावीर ठरला, ज्याने पहिल्या डावात 7, तर दुसऱ्या डावात 1 विकेट घेतली.
https://twitter.com/BCCIdomestic/status/1680467128183586816?s=20
सामन्याच्या एकंदरीत विचार केला, तर नाणेफेक गमावल्यानंतर साऊथ झोनला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण मिळआले. पहिल्या डावात साऊथ झोनने 78.4 षटकात 213 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेला वेस्ट झोन संघ 51 षटकात अवघ्या 146 धावा करून सर्वबाद झाला. वेस्ट झोनला स्वस्तात बाद करण्यासाठी विद्वथ कवेरप्पा याचे योगदान महत्वाचे राहिले. कवेरप्पाने पहिल्या डावात 19 षटके गोलंदाजी केली आणि यात 53 धावा खर्च करून 7 विकेट्स नावावर केल्या. तसेच विजयकुमार विशक (Vijaykumar Vyshak) याने दोन विकेट्स घेतल्या.
त्यानंतर सामन्यातील दुसऱ्या डावात साऊथ झोन संघ 230 धावांवर गुंडाळला गेला. शेवटच्या डावात वेस्ट झोनला विजयासाठी 298 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण त्यांचा संघ 84.2 षटकांमध्ये 222 धावांवर सर्वबाद झाला. सलामीवीर प्रयांक पांचार याने 211 चेंडूत 95 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. पण संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही. साऊथ झोनसाठी यावेळी विजयकुमार विशक आणि साई किशोर (Sai Kishore) यांनी प्रत्येकी चार चार विकेट्स घेतल्या. (South Zone captain Hanuma vihari receives the prestigious Duleep Trophy from BCCI President Roger Binny)
महत्वाच्या बातम्या –
धोनीचा ‘असा’ व्हिडिओ तुम्ही कधीच पाहिला नसेल! अभिनेता योगी बाबूसोबत मस्ती करताना कॅमेऱ्यात कैद
रस्त्यावरून थेट पोडियमवर! कुस्तीपटू संगीताने पदक जिंकत अभिमानाने उंचावली भारतीयांची मान, म्हणाली…