• About Us
  • Privacy Policy
गुरूवार, सप्टेंबर 28, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

रस्त्यावरून थेट पोडियमवर! कुस्तीपटू संगीताने पदक जिंकत अभिमानाने उंचावली भारतीयांची मान, म्हणाली…

रस्त्यावरून थेट पोडियमवर! कुस्तीपटू संगीताने पदक जिंकत अभिमानाने उंचावली भारतीयांची मान, म्हणाली...

Atul Waghmare by Atul Waghmare
जुलै 16, 2023
in कुस्ती, टॉप बातम्या
0
Sangeeta-Phogat

Photo Courtesy: Twitter/sangeeta_phogat


कुस्तीपटू संगीता फोगाट हिने 140 कोटींहून अधिक भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. शनिवारी (दि. 15 जुलै) संगीताने बुडापेस्ट येथे आयोजित हंगरी रँकिंग सीरिज स्पर्धेअंतर्गत नॉन-ऑलिम्पिक 59 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले. विशेष म्हणजे, संगीता जंतर-मंतर येथे भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध आंदोलन करणाऱ्या 6 कुस्तीपटूंपैकी एक होती.

दारुण पराभवाने सुरुवात, नंतर दमदार पुनरागमन
स्पर्धेत संगीता फोगाट (Sangeeta Phogat) हिची सुरुवात दारुण पराभवाने झाली होती. मात्र, तिने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून दमदार पुनरागमन केले. ती उपांत्य सामन्यात पराभूत झाली, पण तिने 20 वर्षांखालील जागतिक चॅम्पियनशिप रौप्य पदक विजेती हंगरीची युवा व्हिक्टोरिया बोर्सोस हिच्याविरुद्ध कांस्य प्ले-ऑफमध्ये 6-2ने विजय मिळवला.

फक्त 80 सेंकद चालला सामना
मागील वर्षी 62 किलो वजनी गटात राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या संगीताने अमेरिकेच्या जेनिफर पेज रॉजर्सविरुद्धच्या पराभवाने सुरुवात केली होती. हा सामना फक्त 80 सेकंद चालला. यामध्ये अमेरिकेच्या कुस्तीपटूने तिला गुण मिळवण्याची संधीच दिली नाही. शेवटी अमेरिकन कुस्तीपटूने संगीताविरुद्ध आघाडी मिळवत विजय साकारला. अमेरिकेच्या ब्रेंडा ऑलिविया रेयनाविरुद्धच्या पुढच्या सामन्यात विजय मिळवण्यात संगीताला यश आले. ब्रेकमध्ये तिने 4-2ने आघाडी घेतली. तसेच, ही आघाडी मजबूत करण्यासाठी शेवटपर्यंत तांत्रिक श्रेष्ठतेच्या आधारावर सामना जिंकला.

दुसऱ्या टप्प्यात संगीताने गमावला नाही एकही गुण
सहा कुस्तीपटूंच्या ड्रॉमध्ये एक विजय आणि एका पराभवाने तिला पोलंडच्या मॅग्डेलेना उर्सजुला ग्लोडेकविरुद्ध उपांत्य सामन्यात पोहोचवले. तिची सुरुवात चांगली राहिली, पण लवकरच ग्लोडेक वरचढ ठरली आणि तिने सामना जिंकला. बोर्सोसविरुद्ध कांस्य प्ले-ऑफ सामन्यात संगीताने टेक-डाऊन मूव्हचा वापर केला. हंगरीच्या खेळाडूने पुनरागमन करत गुण 2-2 असे बरोबरीत केले. मात्र, संगीताने लगेच वेगवान आणि आक्रमक खेळ सुरू केला. बोर्सोस हिने चांगला बचाव केला, पण संगीताने याचे उत्तर देत सामन्यात 4-2ने आघाडी घेतली. दुसऱ्या टप्प्यात संगीताने एकही गुण गमावला नाही. तिने आपल्या खात्यात 2 गुण टाकत कांस्य पदकावर नाव कोरले.

कुणाला समर्पित केले पदक?
संगीताने कांस्य पदक जिंकल्यानंतर ट्वीट केले. तिने लिहिले की, “तुम्हा सर्वांचे शुभेच्छांचे संदेश माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. यावेळी मी भावूक आहे. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. हे पदक फक्त माझे नाहीये. तुम्हा सर्वांचे आहे. मी हे पदक जगातील त्या सर्व संघर्ष करणाऱ्या महिलांना समर्पित करते, जे महिलांविरुद्ध होत असलेल्या गुन्ह्यांविरुद्ध संघर्ष करतात.”

आप सभी के बधाई के संदेश मुझ तक पहुँच रहे हैं इस पल पर बहुत भावुक हूँ।

आप सभी का बहुत बहुत शुक्रिया। यह मेडल सिर्फ़ मेरा नहीं है। सब आप सभी का मेडल है

मैं इस मेडल को दुनिया की उन सभी संघर्षशील महिलाओं को समर्पित करती हूँ जो महिलाओं के विरुद्ध हुए अपराधों के ख़िलाफ़ संघर्षरत हैं।… pic.twitter.com/FyJnqhaHVZ

— Sangeeta Phogat (@sangeeta_phogat) July 15, 2023

संगीताच्या या ट्वीटवर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून चाहते तिचे कौतुकही करत आहेत. (wrestler sangeeta phogat won bronze in hungary dedicated medal to struggling women read)

महत्वाच्या बातम्या-
गुरू योगेश्वर दत्त आणि शिष्य बजरंग पुनियाने ठोकले एकमेकांविरुद्ध शड्डू! एशियन गेम्स ट्रायलवरून नवा वाद
Wrestler Protest: पॉक्सो प्रकरणी बृजभूषण यांना क्लीन चिट; सुवर्णपदक विजेत्यांचे आता काय होणार?


Previous Post

‘विश्वचषकात भारतीय मुस्लिम पाकिस्तानला…’, माजी क्रिकेटपटूच्या विधानाने देशभरात खळबळ

Next Post

विंडीजविरुद्ध 500वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार विराट, 499 सामन्यांमधील परफॉर्मन्स आहे तरी कसा? वाचाच

Next Post
Virat-Kohli

विंडीजविरुद्ध 500वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार विराट, 499 सामन्यांमधील परफॉर्मन्स आहे तरी कसा? वाचाच

टाॅप बातम्या

  • ‘अजूनतरी कोणताही…’, अक्षर पटेलच्या रिप्लेसमेंटवर कोच द्रविडची मोठी प्रतिक्रिया
  • वर्ल्डकप संघात स्थान न मिळाल्याने संतापला तमिम, बोर्डावर लावले गंभीर आरोप, वाचा सविस्तर
  • दक्षिण आफ्रिकेला तगडा झटका! वर्ल्डकप 2023पूर्वी मायदेशी परतला कॅप्टन, कोण हाकणार संघाचा गाडा?
  • ड्रिंक्स देणाऱ्या पोरांच्या हाती सोपवली टीम इंडियाने विजयाची ट्रॉफी! रोहित-राहुलचे होतेय कौतुक
  • बीसीसीआयने पाळला दिलेला शब्द! पर्यावरण संवर्धनासाठी लावली तब्बल इतकी झाडे
  • बांगलादेश क्रिकेटमध्ये भूकंप! वर्ल्डकप आधीच कर्णधार शाकिबची निवृत्तीची घोषणा
  • ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! वर्ल्डकपपूर्वी ऐन मोक्याच्या क्षणी बाहेर झाला जबरदस्त खेळाडू, लगेच वाचा
  • अर्रर्र! बुमराहने 3 विकेट्स घेऊनही नावावर झाला लाजीरवाणा विक्रम, 6 वर्षांनंतर बूम बूमची खराब गोलंदाजी
  • चाहत्याचा शाहरुखला कोहलीबद्दल ‘तो’ प्रश्न; किंग खान म्हणाला, ‘माझं विराटवर खूप प्रेम, तो तर जावयासारखा…’
  • वर्ल्डकपसाठी नव्या-जुन्या खेळाडूंना घेत बलाढ्य संघांनी कसली कंबर! पाहा दहाच्या दहा Teamsचे Squad
  • भारतीय संघाला घाम फोडणाऱ्या ‘त्या’ दोघांना कमिन्सने दिले विजयाचे श्रेय; म्हणाला, ‘त्यांच्यामुळे…’
  • ‘इथल्या लोकांनी आमचे…’, विश्वचषकासाठी भारतात दाखल झाल्यानंतर बाबर आणि रिझवानची लक्षवेधी प्रतिक्रिया
  • CWC23: तब्बल 7 वर्षांनंतर पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात दाखल, हैदराबाद विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल
  • अखिल भारतीय एसएनबीपी स्पर्धेत १५ राज्यांचा सहभाग, महिला हॉ़की स्पर्धेत ८ संघ
  • मालिका जिंकल्यानंतर रोहित वैयक्तिक प्रदर्शनावर खुश! विश्चचषक संघाबाबत दिली खास प्रतिक्रिया
  • तूच खरा लीडर! पराभवानंतरही रोहितच्या ‘त्या’ कृतीने जिंकले सर्वांचे मन
  • अखेरच्या वनडेत टीम इंडियाचा दारूण पराभव! ऑस्ट्रेलियाचा सांघिक कामगिरीच्या जोरावर शानदार विजय
  • BREAKING! आयपीएलमध्ये विराटशी पंगा घेणाऱ्या नवीनने केली वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
  • कमबॅकसाठी केन विलियम्सन तयार! सराव सामन्याआधी दिली खास प्रतिक्रिया
  • IND vs AUS । रोहितने पाडला षटकारांचा पाऊस, अवघ्या ‘इतक्या’ चेंडूत अर्धशतक पूर्ण
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In