जागतिक फुटबॉल संघटना फिफाने स्पॅनिश फेडरेशनचे अध्यक्ष लुईस रुबियालेस यांना 90 दिवसांसाठी निलंबीत केले आहे. फिफा महिला विश्वचषकच्या अंतिम सामन्यादरम्यान स्पॅनिश संघाची खेळाडू जेनिफर हर्मोसो सोबत झालेल्या चुंबनाच्या घटनेमुळे फिफाने हे पाऊल उचले आहे. फिफाची शिस्तपालन समिती या घटनेची पुर्णपणे चौकशी करणार आहे. तोपर्यंत रुबियालेस फेडरेशनच्या कोणत्याही उपक्रमात भाग घेऊ शकणार नाहीत.
फिफाच्या अतिंम सामन्यामध्ये पुरस्कार विरतणाच्या वेळी लुईस रुबियालेस (Luis Rubiales) हे जेनिफर हर्मोसो (Jennifer Hermoso) हिचे चुंबन करताना दिसले. याच घटनेने जगभरात खळबळ उडाली आहे. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी देखिल याची दखल घेतली आहे. फक्त माफी पुरेशी नाही असे त्यांचे मत आहे. हर्मोसोने आधीच सांगितले होते की ते स्पॅनिश एफएच्या अध्यक्षांच्या वागणुकीशी सहमत नाहीत, परंतु रुबियालेस यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला, कारण आपण सीमा ओलांडली नाही असे त्यांचे मत आहे.
स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नसल्याचे लुईस रुबियालेस यांनी सांगितले. याआधी मीडियामध्ये बातम्या आल्या होत्या की रुबियालेस शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. रुबियालेस यांनी सोमवारी या भागाबद्दल माफी मागितली, परंतु आपण राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Luis Rubiales kissing spanish soccer player Jennifer Hermoso.#LuisRubiales #JenniHermoso #kissing pic.twitter.com/6AhWeuX5PV
— World Statistics (@WorldSportStats) August 21, 2023
रुबियालेस काय म्हणाले?
रुबियालेस म्हणाले, “मी माझ्या आदर्शाचे रक्षण करण्यासाठी कुप्रसिद्ध होण्यासाठी तयार आहे. मला सध्या लोकांकडून खूप त्रास होत आहे, हे योग्य नाही. त्यावेळी जे काही घडले त्या बद्दल मला निर्भीडपणे माफी मागायची आहे. खरतर जेनिफरनेच मला उचलुन घेतले. मी तीला चुंबना बद्दल आधिच विचारले होते. तिने जेव्हा होकार दिला त्या वेळी हा प्रकार घडला. आता यामुळे अनेक लोक माझ्या सोबत आहे तर काही लोक मला विरोध करत आहेत.” (spanish football presindet kiss him women football player Jennifer Hermoso)
महत्वाच्या बातम्या-
फलंदाजीमध्ये 99.94ची जबरदस्त सरासरी असलेल्या ‘डॉन’ला इंग्लंडच्या ‘या’ गोलंदाजाने दिलेला सर्वाधिक त्रास
अन् डॉन ब्रॅडमन भारताच्या महान फलंदाजाला शिवसेना व बाळासाहेबांबद्दल विचारत होते…