इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२१) गतविजेता मुंबई इंडियन्स संघ काही दिवसांपूर्वीच युएईला पोहोचला आहे. त्यानंतर संघाने रविवारी (१५ ऑगस्ट) एक छोटा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांच्या मुंबईहून अबू धाबीला जाणाऱ्या विमान पायलटने उड्डाण भरताना क्रिकेटच्या शैलीत विशेष घोषणा केली असल्याचे दिसत आहे. त्यांनी क्रिकेटच्या भाषेत आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघाचे एकप्रकारे स्वागत केले आहे.
या व्हिडिओत दिसते की पायलट अबू धाबीसाठी उड्डाण भरताना काही तरी बोलतात. ते म्हणतात की, “मुंबई ते अबू धाबी या विमान ९०६५ चार्टर सेवेमध्ये आपले स्वागत करणे ही सन्मानाची गोष्ट आहे. आज सकाळी झालेल्या पावसानंतर आम्ही त्वरित अबू धाबीला रवाना होण्याचे व्यवस्थापन केले. जसे रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक संघासाठी करतात.”
पायलट पुढे म्हणाले की, “उड्डाणाच्या तपशीलांनुसार, आम्ही एअरबस ३३१ विमान समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर फिरवणार आहोत. विमान सुमारे ९०० किमी/तासाचा मैदानी वेग राखेल जे आम्हाला आमच्या गंतव्य स्थानावर सुमारे ४५ मिनिटांत उतरवेल. थोड्याच वेळात, कायरन पोलार्डला आणखी एक शतक ठोकणे आवश्यक आहे.”
“हवाई वाहतूक कोंडीच्या आधारावर आम्ही शक्य तितक्या लवकर अबू धाबीमध्ये उतरण्याचा प्रयत्न करू. तथापी मी असे म्हणू शकतो की, हे हार्दिक पांड्या किंवा इशान किशनच्या अर्धशतकांच्या विक्रमा इतका वेगवान नसेल. संपूर्ण इंडिगो कुटुंबाच्या वतीने, आम्ही आपणा सर्वांना या हंगामासाठी शुभेच्छा देतो. आज सकाळी तुम्ही विमानात असणे हा एक सन्मान आहे. धन्यवाद!,” असेही ते म्हणाले.
👨🏻✈️🇸🇴🇺🇳🇩 🇴🇳🎙
𝕊𝕡𝕖𝕔𝕚𝕒𝕝 𝕒𝕟𝕟𝕠𝕦𝕟𝕔𝕖𝕞𝕖𝕟𝕥 on our flight to Abu Dhabi ✈️#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 pic.twitter.com/d4qxMUWCMV
— Mumbai Indians (@mipaltan) August 15, 2021
मुंबई इंडियन्सचे भारतीय शिलेदार शुक्रवारी (१३ ऑगस्ट) अबुधाबीमध्ये दाखल झाले आहेत. तिथे काही दिवस विलगीकरणात ठेवल्यानंतर संघ त्यांचे हंगामपूर्व प्रशिक्षण सुरू करेल. मुंबई इंडियन्स १९ सप्टेंबर रोजी दुबईत चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यासह आयपीएल मोहिमेला सुरुवात करणार आहे. पाच वेळा आयपीएल जिंकणारा हा संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
…म्हणून भारताविरुद्ध रूटच्या बॅटमधून होतेय धावांची वर्षा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराने सांगितले रहस्य
“ए वतन वतन मेरे …”, मोहम्मद शमीने स्वातंत्र्यदिनी मुलीच्या डान्सचा व्हिडिओ केला शेअर
अँडरसनला बाउंसर टाकलेले पाहून डेल स्टेन म्हणाला, “बुमराह जेव्हा फलंदाजीला येईल तेव्हा…”