भारतात होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. 45 दिवस 48 सामने आणि 10 संघ असा सगळा गोतावळा या स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. मात्र, या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी काही खेळाडू असे आहेत, ज्यांनी फक्त मोजक्याच विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला आणि अविस्मरणीय कामगिरी करून दाखवली. यापैकीच एक खेळाडू म्हणजे इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स होय. विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी इंग्लंडला मोठा दिलासा मिळाला आहे. स्टोक्सने वनडे विश्वचषक लक्षात घेता निवृत्तीतून माघार घेतली आहे. आता त्याचे हे पाऊल इंग्लंडसाठी विश्वचषकात महत्त्वाचे ठरू शकते. चला तर, मागील विश्वचषकात स्टोक्सने काय कमाल-धमाल केली होती पाहूयात…
किती विश्वचषकात खेळला स्टोक्स?
अनेक खेळाडूंना माहिती नसेल, पण बेन स्टोक्स (Ben Stokes) हा फक्त एका वनडे विश्वचषकात खेळला आहे. तो विश्वचषक इतर कोणता नसून विश्वचषक 2019 (World Cup 2023) होता. स्टोक्सने अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 84 धावांची सर्वोच्च खेळी साकारत इंग्लंडला पहिल्यांदा वनडे विश्वचषक चॅम्पियन बनवले होते. त्याच्या या खेळीत 2 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. याव्यतिरिक्त तो संपूर्ण स्पर्धेत शानदार लयीत दिसला होता. स्टोक्सने बॅट आणि चेंडू दोन्ही विभागात चमकदार कामगिरीचे दर्शन घडवले होते.
स्टोक्सची विश्वचषकातील कामगिरी
बेन स्टोक्स विश्वचषक 2019 (Ben Stokes World Cup 2019) स्पर्धेत एकूण 11 सामने खेळला होता. यातील 10 डावात फलंदाजी करताना त्याने 66.42च्या सरासरीने 465 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 5 वेळा 50हून अधिक धावसंख्या केली होती. विशेष म्हणजे, त्याने 11 षटकार आणि 38 चौकारांचीही बरसात केली होती. ही झाली फलंदाजी कामगिरी.
आता विश्वचषकातील स्टोक्सच्या गोलंदाजी कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 11 सामन्यातील 11 डावात 35.14च्या सरासरीने आणि 4.83च्या इकॉनॉमी रेटने 7 विकेट्स घेतल्या होत्या. 23 धावा खर्चून 3 विकेट्स ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी होती.
सध्याची कामगिरी
बेन स्टोक्स याच्या सध्याच्या कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने वनडे निवृत्ती मागे घेतल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध 3 वनडे सामने खेळले. त्यात त्याने 78.33च्या सरासरीने 235 धावा केल्या. या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला होता. यामध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतकाचा समावेश होता. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत त्याने सर्वाधिक 182 धावांची खेळी साकारली होती. ही इंग्लंडसाठीची वनडेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. स्टोक्सपूर्वी जेसन रॉय याने 2018मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 180 धावांची खेळी साकारली होती. त्यामुळे पुनरागमनासह स्टोक्स जबरदस्त फॉर्ममध्ये आला आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेत इंग्लंड संघाला याचा नक्कीच फायदा होईल.
स्टोक्सची वनडे कारकीर्द
स्टोक्सने ऑगस्ट 2011मध्ये आयर्लंडविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. त्याने वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यापूर्वी इंग्लंडकडून 105 वनडे सामने खेळले होते. त्यात त्याने फलंदाजी करताना 38.98च्या सरासरीने 2924 धावा केल्या होत्या. यामध्ये 3 शतके आणि 21 अर्धशतकांचाही समावेश होता. यातील नाबाद 102 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. याव्यतिरिक्त त्याने गोलंदाजी करताना 74 फलंदाजांना तंबूत धाडले.
मात्र, पुनरागमनानंतर त्याच्या वनडे क्रिकेट आकडेवारीमध्ये 3 सामन्यांची भर पडली. अशाप्रकारे त्याने एकूण 108 सामन्यात 40.50च्या सरासरीने 3159 धावा केल्या. यामध्ये 182 ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. त्याच्या नावावर आता एकूण 4 शतके आणि 22 अर्धशतकांची नोंद झाली आहे. (special story about Ben Stokes world cup records and performance)
विश्वचषक विशेष-
किस्से वर्ल्डकपचे: आणि मलिंगाचे ‘ते’ चार चेंडू इतिहासात अजरामर झाले
किस्से वर्ल्डकपचे: गप्टिलचा थ्रो स्टम्पसवर नव्हेतर भारतीयांच्या हृदयावर लागलेला
विश्वचषक कमी, पण शतके जास्त! रोहितचा World Cupमधील भन्नाट Record, 2023मध्ये भीमपराक्रम करण्याची संधी
वर्ल्डकप 2019 मध्ये घडलेले सर्व विक्रम, रोहित-वॉर्नरकडे यावर्षी मोठी संधी
किस्से वर्ल्डकपचे: वर्ल्डकप म्हटलं की 2003 ची फायनल आणि पॉंटिंग डोक्यातून जात नाही
किस्से वर्ल्डकपचे: त्यादिवशी चिन्नास्वामीवर केविन ओब्रायनने इंग्लडला गुडघ्यावर आणलेलं
World Cup 2023 Preview: 10 संघांपासून ते सामन्यांच्या ठिकाणांपर्यंत, सर्व माहिती एकाच क्लिकवर
कशी आहे विराटची World Cupमधील कामगिरी? 2 वर्ल्डकपमध्ये ठोकलंय शतक, वाचा लेखाजोखा