जोहान्सबर्गचं वॉडरर्स स्टेडियम खचाखच भरलेलं. मौका होता पहिल्यावहिल्या टी२० वर्ल्डकप फायनलचा. समोरासमोर सगळ्याच बाबतीत वैर असलेले भारत-पाकिस्तान. टी२०चा वर्ल्ड चॅम्पियन ही मोठी गोष्ट होती, आणि हा पहिला मान आपल्यालाच मिळाला पाहिजे म्हणून दोन्ही टीम तयार होत्या. बघता-बघता ४० पैकी ३९ ओव्हरचा खेळ झाला. लास्ट ओव्हरला पाकिस्तान जिंकायला हव्या होत्या १३ रन्स, आणि भारताला जिंकायला फक्त एक विकेट. लास्ट ओव्हर, आधी भरपूर मार खाल्लेला हरभजन टाकणार का? असा प्रश्न पडला असतानाच सर्वांनी बॉलिंग एंडला पाहिला जोगिंदर शर्मा. याच जोगिंदरने गुरुवारी (दि. ३ फेब्रुवारी) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. चला तर त्याच्याविषयी जाणून घेऊया…
हरभजन सिंग जगातल्या साऱ्या स्टेडियमवर खेळून आलेला इंडियाचा सगळ्यात एक्सपिरीयन्स स्पिनर, पण त्या फायनलला मिसबाह उल हकने त्याला बेकार चोपलेला. त्यामुळे फायनल ओव्हरची जबाबदारी होती जोगिंदर शर्माच्या खांद्यावर.
जोगिंदर शर्मा चांगला हट्टाकट्टा हरियाणवी गडी. मेडियम पेस बॉलिंग करायचा. फक्त चार वनडे खेळलेल्या जोगिंदरची टी२० वर्ल्डकप ही पहिलीच मोठी टूर्नामेंट. बरेच दिवसांनी हरियाणाचा कुणीतरी प्लेयर इंडिया खेळत होता. टी२० वर्ल्डकप खेळायला सिनियर प्लेयरनी नकार दिल्याने जोगिंदरचा नंबर लागलेला.
हेही पाहा- वर्ल्डकपबरोबर रिअल लाईफचा हिरो ठरलेला क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा
चला आपण पुन्हा एकदा त्या फायनलच्या फायनल ओव्हरकडे जाऊया. मिस्बाह वर्ल्डकप पाकिस्तानात न्यायचा म्हणून अडून बसलेला. जोगिंदरन रनअप घेतला पहिला बॉल टाकला. बॉल वाईड. वाटलं कार्यक्रम गंडला. त्यानंतर डॉट टाकून त्यान कमबॅक केला. नेक्स्ट बॉल सिक्स. वर्ल्डकप गेला म्हणून सगळ्यांनी जोगिंदरच्या खानदानाचा उद्धार केला. आता चार बॉलमध्ये पाकिस्तानला जिंकायला फक्त सहा रन्स. जोगिंदरने पुन्हा रनअप घ्यायला सुरुवात केली आणि बॉल टाकला. सरळसरळ छक्के मारणाऱ्या मिसबाहच्या डोक्यात काय आलं आणि त्याने मागच्या बाजूला स्कूप शॉट मारला. बॉल हवेत उडाला. सारे जण स्तब्ध झाले. कॉमेंट्री करत असलेल्या शास्त्री गुरुजींचा आवाज आला. In the air… Sreesanth takes it… India win… भारत वर्ल्ड चॅम्पियन बनला आणि तुमच्या आमच्यासारखा अगदीच सामान्य दिसणारा जोगिंदर शर्मा हिरो बनलेला. सार्या भारतात फटाके फुटत होते आणि नाव गाजत होते जोगिंदर शर्माचे.
जोगिंदर शर्मा हिरो व्हायची ही पहिली वेळ नव्हती. सेमी फायनलला खुनशी ऑस्ट्रेलिया आपल्याला भिडलेली. नुकताच ६ बॉल ६ सिक्स मारून वरचा दर्जा मिळवलेला युवराज त्यांच्यावर तुटून पडला.. ती ७० रनांची अफलातून इनिंग आजही कुणी विसरला नसेल. ऑस्ट्रेलियाकडून हेडन, गिलख्रिस्ट, सायमंड यांनी छोटी छोटी तुफान आणली, पण श्रीसंत इथं नडला. हेडनचा बोल्ड उडवल्यावर त्यान पीचवर हात आपटून केलेला सेलिब्रेशन आपण कितीतरी जणांनी कॉपी केल असणार. त्या मॅचला लास्ट ओव्हरला २२ रन डिफेन्ड करायची जबाबदारी जोगीचीच होती. पुढं माइक हसी असल्यान कार्यक्रम होतोय का काय? असं वाटत असताना जोगीन पहिले दोन बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉलला हसीला आउट करत टीम इंडिया फायनल खेळणार हे निश्चित केलं.
वर्ल्ड कप फायनल नंतर जोगिंदर पुन्हा कधी टीम इंडियाच्या ब्लू जर्सीत दिसला नाही. वर्ल्डकप जिंकल्यावर हरियाणा सरकारने त्याला २१ लाखाचं बक्षिसं अन् पोलीस खात्यात नोकरी दिली. १-२ आयपीएल सीजन खेळून मेनस्ट्रीम क्रिकेटपासून तो दूर गेला. २०११मध्ये पायाची इंजरी झाली आणि त्याचं क्रिकेट कायमच सुटलं. तो आपल्या पोलिसाच्या नोकरीत रमला. हा वर्ल्डकप हिरो जवळपास बारा वर्षांनी तो पुन्हा चर्चेत आला. कोरोनाचा राक्षस दारोदारी धडकत असताना आपली खाकी वर्दी घालून डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस असलेला जोगिंदर, लोकांना कर्फ्यू पाळायला सांगत होता. तेही एखाद्या हिरो प्रमाणेच.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! भारतीय क्रिकेटर जोगिंदर शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, ट्वीट करत दिली माहिती
ब्रेकिंग! रोहित ज्याच्या कॅप्टन्सीखाली खेळला, त्याची 71 लाखांची फसवणूक; कुटुंबासह जीवे मारण्याचीही धमकी