---Advertisement---

न भूतो…! विश्वचषक स्पर्धांमध्ये खणकलंय शाकिबचं नाणं, ‘हा’ भीमपराक्रम करणारा बांगलादेशचा एकमेव धुरंधर

On: शनिवार, सप्टेंबर 23, 2023 5:08 PM
Shakib-Al-Hasan
---Advertisement---

जसजशी कोणतीही मोठी स्पर्धा जवळ येते, तसतसे त्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंविषयीची माहिती जाणून घेण्याची क्रिकेटप्रेमींची उत्सुकताही वाढू लागते. असेच काहीसे विश्वचषक 2023 स्पर्धेतील खेळाडूंबाबतही आहे. स्पर्धेत असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी मागील विश्वचषकात असा काही कारनामा केला आहे, ज्यांच्याबद्दल खूप कमी चाहत्यांना माहिती आहे. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे बांगलादेश संघाचा दिग्गज अष्टपैलू आणि कर्णधार शाकिब अल हसन होय. आज या लेखातून आपण शाकिबची विश्वचषक स्पर्धांमधील उल्लेखनीय कामगिरी पाहूयात…

तब्बल 4 विश्वचषक खेळलाय शाकिब
बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याने ऑगस्ट 2006मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. त्याच्या वनडे कारकीर्दीला आता 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 17 वर्षांच्या कारकीर्दीत त्याने 4 वनडे विश्वचषक खेळले आहेत. त्यामध्ये विश्वचषक 2007, विश्वचषक 2011, विश्वचषक 2015 आणि विश्वचषक 2019 या स्पर्धांचा समावेश आहे.

विश्वचषकातील ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव बांगलादेशी
शाकिबने या चारही विश्वचषकात एकूण 29 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 45.84च्या सरासरीने 1146 धावांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 2 शतके आणि 10 अर्धशतकेही निघाली आहेत. विश्वचषकात नाबाद 124 ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. विशेष म्हणजे, विश्वचषक स्पर्धेत 1000हून अधिक धावसंख्या करणारा तो बांगलादेशचा एकमेव फलंदाज आहे.

शाकिबची चारही विश्वचषकातील सविस्तर कामगिरी पाहायची झाली, तर त्याने 2007च्या विश्वचषकात 9 सामने खेळताना 28.85च्या सरासरीने 202 धावा आणि 43.14च्या सरासरीने 7 विकेट्सही घेतल्या होत्या. तसेच, 2011च्या विश्वचषकात त्याने 6 सामन्यात 23.66च्या सरासरीने 142 धावा आणि 27.87च्या सरासरीने 8 विकेट्स घेतल्या होत्या. याव्यतिरिक्त 2015च्या विश्वचषकात त्याने 6 सामन्यात 39.20च्या सरासरीने 196 धावा आणि 37.25च्या सरासरीने 8 विकेट्स घेतल्या होत्या. शाकिबसाठी 2019चा विश्वचषक खास ठरला होता. या विश्वचषकात त्याने 8 सामने खेळताना 86.57च्या सरासरीने 606 धावा केल्या होत्या. तसेच, गोलंदाजी करताना त्याने 36.27च्या सरासरीने 11 विकेट्सही घेतल्या होत्या. विशेष म्हणजे, या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी होता.

सध्याची कामगिरी
शाकिब याने अलीकडेच आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये त्याने 5 सामने खेळताना 43.25च्या सरासरीने 173 धावा केल्या होत्या. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश होता. यादरम्यान 80 ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या राहिली होती. याव्यतिरिक्त गोलंदाजी करताना त्याला 5 सामन्यात फक्त 3 विकेट घेण्यात यश आले होते. आगामी विश्वचषकात तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात चांगली कामगिरी करताना दिसू शकतो.

शाकिबची वनडे कारकीर्द
शाकिबच्या वनडे कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 240 सामने खेळले आहेत. यातील 227 डावात फलंदाजी करताना त्याने 37.67च्या सरासरीने 7384 धावा केल्या आहेत. यामध्ये 9 शतके आणि 35 अर्धशतकांचाही समावेश आहे. नाबाद 134 ही त्याची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या आहे.

याव्यतिरिक्त त्याने 234 डावात गोलंदाजी करताना 29.32च्या सरासरीने आणि 4.44च्या इकॉनॉमी रेटने 308 विकेट्स घेतल्या आहेत. तो वनडेत बांगलादेशसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही आहे. 29 धावा खर्चून 5 विकेट्स ही त्याची वनडेतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. (special story about Shakib Al Hasan world cup records and performance)

विश्वचषक विशेष-
विश्वचषक कमी, पण शतके जास्त! रोहितचा World Cupमधील भन्नाट Record, 2023मध्ये भीमपराक्रम करण्याची संधी
वर्ल्डकप 2019 मध्ये घडलेले सर्व विक्रम, रोहित-वॉर्नरकडे यावर्षी मोठी संधी
किस्से वर्ल्डकपचे: वर्ल्डकप म्हटलं की 2003 ची फायनल आणि पॉंटिंग डोक्यातून जात नाही
किस्से वर्ल्डकपचे: त्यादिवशी चिन्नास्वामीवर केविन ओब्रायनने इंग्लडला गुडघ्यावर आणलेलं
World Cup 2023 Preview: 10 संघांपासून ते सामन्यांच्या ठिकाणांपर्यंत, सर्व माहिती एकाच क्लिकवर
कशी आहे विराटची World Cupमधील कामगिरी? 2 वर्ल्डकपमध्ये ठोकलंय शतक, वाचा लेखाजोखा
विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा, हुकमी एक्का बाहेर; 15 महिन्यांनंतर ‘या’ धुरंधराचे कमबॅक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---