---Advertisement---

शेतकऱ्याचा मुलगा, ज्याने पदार्पणात केला अर्धशतकवीर अगरवालचा अडथळा दूर; वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

On: सोमवार, एप्रिल 19, 2021 7:58 AM
---Advertisement---

असे म्हटले जाते की, मनात जिद्द आणि काहीतरी करण्याची मनापासून इच्छा असेल; तर कुठलीही गोष्ट तुम्हाला अडवू शकत नाही. असे अनेक लोक आहेत ज्यांनी हलाखीच्या परिस्थितीवर मात करत, जिद्दीने हवं ते मिळवलं आहे. याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे, बडोद्यातील एका छोट्याश्या गावातील शेतकऱ्याचा मुलगा ‘लुकमान इकबाल मेरिवला’.

लुकमान इकबाल या २९ वर्षीय गोलंदाजाने कधी विचारही नव्हता केला की, त्याला इतकी मोठी संधी मिळेल. आयपीएल २०२१ च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यावर २० लाखांची बोली लावत आपल्या संघात सामाविष्ट करून घेतले.

याच लुकमान इकबालला १८ एप्रिल रोजी पंजाब किंग्जविरुद्ध पदार्पणाची संधी मिळाली. या सामन्यात त्याने ३ षटके गोलंदाजी करताना ३२ धावा देत १ महत्त्वाची विकेट घेतली. शिखर धवनच्या हातून पंजाबचा सलामीवीर मयंक अगरवालला झेलबाद करत त्याने मोठा अडथळा दूर केला होता. अशाप्रकारे मयंक हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट ठरला.

लुकमान इकबाल याने एका मुलाखतीत म्हटले होते का की, “क्रिकेट खेळण्यासाठी मला घर सोडून माझ्या मामाच्या घरी राहावे लागले होते. २००३- ०४ मध्ये मी माझ्या गावातील शेतात गोलंदाजीचा सराव करत असे. माझे काका माझ्या खेळावर खूप खुश होत असायचे. त्यांनी माझ्या कुटुंबियांना सांगितले होते की, मला क्रिकेट खेळू द्या मी खूप पुढे जाऊ शकतो. त्यांनतर माझ्या वडिलांनी मला क्रिकेट खेळण्यासाठी माझ्या मामाच्या घरी पाठवले. कारण माझे घर बडोदा क्रिकेट मैदानापासून १२०-१३० किलोमीटर लांब होते.”

हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या आणि इरफान पठाण यांनी केली मदत
बडोदा संघासाठी खेळणाऱ्या या २९ वर्षीय गोलंदाजाला त्याच्या कठीण काळात, भारतीय संघाच्या वरिष्ठ खेळाडूंनी खूप मदत केली. कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या आणि इरफान पठाण यांनी त्याच्या कठीण काळात त्याच्यासाठी मदतीचा हात पुढे केला.

याबद्दल बोलताना लुकमान इकबालने सांगितले की, ” बडोदा क्रिकेट संघाकसोबत सराव करत असताना इरफान पठाण यांनी एकदा माझ्याजवळ येऊन माझ्या बुटांचा नंबर विचारला होता. त्यांनतर त्यांनी मला नवीन बूट घेऊन दिले होते. तसेच त्यांनी मला गोलंदाजीत सुधार करण्यात देखील मदत केली. तर हार्दिक पंड्याने २ वेळेस मला क्रिकेट किट गिफ्ट केली होती.”

यॉर्कर चेंडू टाकण्यावर देत आहे जास्त भर
लुकमानने आतापर्यंत खेळलेल्या १७ प्रथम श्रेणी सामन्यात ५९ गडी बाद केले आहेत. तसेच लिस्ट- ए क्रिकेटमध्ये ३२ सामन्यात ४१ गडी बाद करण्यात त्याला यश आले आहे. लुकमनाने सांगितले होते की, “आयपीएलमध्ये निवड झाल्यापासून मी स्विंग गोलंदाजीवर जास्त भर देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच मी यापुर्वीही टी -२० प्रकारात यॉर्कर चेंडूवर खूप काम केले आहे. यॉर्कर चेंडू ही माझी ताकत आहे.” त्याच्या याच यॉर्कर चेंडूची कमाल सर्वांना पदार्पणात सामन्यात पाहायला मिळाली.

महत्त्वाच्या बातम्या-

सचिनच्या कट्टर मित्राने अर्जुनच्या टिकाकारांना सुनावले खडे बोल; म्हणाला, “त्यानेही इतर युवा खेळाडूंप्रमाणे…”

एकेकाळी सूर्यकुमारने घेतला होता विराटशी पंगा, आता त्याच्याच नेतृत्त्वाखाली खेळणार टी२० क्रिकेट

“मला नाही वाटत अश्विनचे वनडे आणि टी२० संघात पुनरागमन होईल,” गावसकरांचे मोठे भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---