---Advertisement---

बाबो! स्पायडरमॅन अन् तोही थेट मैदानात, पाहा लाईव्ह सामन्यादरम्यानचा ‘तो’ भन्नाट व्हिडिओ

Spiderman-BBL
---Advertisement---

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या बिग बॅश लीग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळत आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात काही ना काही असा प्रकार घडत असतो, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. या स्पर्धेतील तिसरा सामना मेलबर्न रेनेगड्स आणि ॲडीलेड स्ट्रायकर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मेलबर्न रेनेगड्स संघाने २ धावांनी विजय मिळवला. दरम्यान या स्पर्धेत असा काही प्रकार घडला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

तुम्ही मैदानावर फलंदाजांना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना पाहिले असेल. परंतु, लाईव्ह सामन्यात कधी स्पायडरमॅनने प्रवेश केल्याचे पाहिले आहे का? असाच प्रकार बिग बॅश लीग स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात घडला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

तर झाले असे की, येत्या काही दिवसांत स्पायडरमॅनची नवीन मालिका ‘नो वे होम’ प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी स्वतः स्पायडरमॅनने मैदानात एन्ट्री घेतली होती. त्याने मैदानाच्या वरच्या दिशेने एन्ट्री घेतली. त्याला पाहून मैदानात उपस्थित असलेले चाहते भलतेच खुश झाले होते. दरम्यान स्पायडरमॅनने अनेक युक्त्या देखील करून दाखवल्या. जे पाहून चाहत्यांना आनंद गगनात मावेनासा झाला होता. हा व्हिडिओ बिग बॅश लीगच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तसेच हा फोटो चाहत्यांच्या पसंतीचा ठरतोय.

या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात मेलबर्न रेनेगड्स आणि ॲडीलेड स्ट्रायकर्स आमने सामने होते. मेलबर्न रेनेगड्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मेलबर्न रेनेगड्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना मॅकेन्झी हार्वेने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली होती. तर सॅम हार्वेने ३३ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर मेलबर्न रेनेगड्स संघाला २० षटक अखेर ९ बाद १५३ धावा करण्यात यश आले होते.

या धावांचा पाठलाग करताना ॲडीलेड स्ट्रायकर्स संघाकडून हॅरी निल्सेनने ३० धावांची खेळी केली, तर मॅट शॉर्टने २९ धावांचे योगदान दिले. परंतु, ॲडीलेड स्ट्रायकर्स संघाला या सामन्यात २ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

महत्वाच्या बातम्या : 

“संपूर्ण आठवडा तुम्ही माझ्यासोबत असाल”, ऍशेस मालिकेपूर्वी स्टोक्स वडिलांच्या आठवणीत भावुक

मुंबई कसोटीतील शतकानंतरही दक्षिण आफ्रिकेत मंयक असेल राखीव पर्याय, माजी प्रशिक्षकांनी सांगितले कारण

कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात कमिन्सची ऐतिहासिक कामगिरी; ५९ वर्षांनतर केलाय ‘असा’ कारनामा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---