भारतीय संघ येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. यातील भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रंगणार आहे. अशात भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याने ऑस्ट्रेलियात कशाप्रकारे गोलंदाजी केली पाहिजे, याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. चला तर जाणून घेऊया अश्विन गोलंदाजांना काय सल्ला देतोय…
आर अश्विन (R Ashwin) याला वाटते की, भारतीय मैदानांमध्ये लहान सीमारेषा असल्यामुळे गोलंदाजांना बचावात्मक खेळ दाखवावा लागतो. मात्र, दुसरीकडे आगामी टी20 विश्वचषकात (T20 World Cup) यजमान ऑस्ट्रेलियाच्या मोठमोठ्या मैदानांमध्ये गोलंदाजांना आक्रमक भूमिका घेण्याची संधी असेल.
अश्विनने सोमवारी (दि. 10 ऑक्टोबर) वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात भारतीय संघाकडून गोलंदाजी केली नाही. मात्र, त्याने संघसहकाऱ्यांसोबत रविवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघामध्ये खेळण्यात आलेल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्याचा पुरेपूर आनंद लुटला होता. अशअविन म्हणाला की, “भारतात टी20 आणि द्विपक्षीय सामन्यांमध्ये जे होते, त्यातून आपण शिकू शकतो. इथे म्हटले जाते की, गोलंदाजांविरुद्ध भरपूर धावा केल्या जात आहेत, परंतु भारतात सीमारेषा 30 यार्डाच्या अगदी जवळ आहेत.”
अश्विनने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर म्हटले की, “जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियात येता, तेव्हा सीमारेषा खूप मोठी असते, त्यामुळे गोलंदाजांना प्रयोग करण्याची संधी मिळते. तुम्हाला कशाप्रकारची गोलंदाजी करायची आहे, हे जाणून घेणेही खूप महत्त्वाचे आहे. अशा वेळी तुम्ही जोखीम उचलण्याचे धाडस करू शकता.”
Inside #TeamIndia's nets session with Batting Coach – Vikram Rathour, Bowling Coach – Paras Mhambrey & Fielding Coach – T Dilip. pic.twitter.com/L8E3yosSbT
— BCCI (@BCCI) October 10, 2022
भारतीय संघाने टी20 विश्वचषकासाठी आधीच ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर पाऊल ठेवले आहे. अश्विन म्हणाला की, “टी20 विश्वचषकासाठी 2 आठवड्याचा कालावधी आहे आणि ही एक महत्त्वाची स्पर्धा आहे. आम्ही ही स्पर्धा गांभीर्याने घेत आहोत. आम्ही इथल्या परिस्थितीत स्वत:ला सावरून घेण्यासाठी लवकर आलो आहोत. हे गरजेचे होते की, आम्ही येथे लवकर पोहोचून गती आणि उसळी चेंडूचा सराव करून घेतला पाहिजे. अनेक खेळाडू संघात नवीन आहेत, अशात ते अनुकूल होण्यासाठी त्यांच्याकडे चांगला वेळ आहे.”
भारतीय संघ हा टी20 विश्वचषक आपल्या नावावर करतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जडेजाची कबुली! मोदींशी आहे डायरेक्ट कनेक्शन, पठ्ठ्याने ट्वीट करत स्पष्टच सांगितलं
भारीच की! एमएस धोनीने सुरू केली फ्रँचायझीच्या मालकीची क्रिकेट अकादमी, खेळपट्ट्यांची संख्या डोळे फिरवणारी