या वर्षातील 2 सर्वात मोठ्या स्पर्धा म्हणजे आशिया चषक 2023 आणि वनडे विश्वचषक 2023 होय. या स्पर्धांकडे जगाचे लक्ष लागले आहे. वनडे विश्वचषक स्पर्धा वर्षाच्या अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळली जाणार आहे, तर आशिया चषक स्पर्धा ऑगस्टच्या अखेरीस आणि सप्टेंबर महिन्यात पार पडणार आहे. अशात या दोन्ही स्पर्धेसाठी दिग्गज फिरकीपटू आर अश्विन याची भारतीय संघात निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अश्विन विश्वचषकासाठी भारतीय संघात?
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) आणि वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेसाठी आर अश्विन (R Ashwin) याच्या नावाचा समावेश भारतीय संघात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, आर अश्विन आणि युझवेंद्र चहल यांच्यापैकी एका फिरकीपटूची दोन्ही स्पर्धांसाठी भारतीय संघात निवड होऊ शकते. चहलचा सध्याचा फॉर्म पाहता त्याची संघात निवड होण्याची शक्यता कमी आहे. चहलला 72 वनडे सामन्यांचा अनुभव आहे. त्यात त्याने 121 विकेट्स घेतल्या आहेत.
अश्विनने शेवटचा वनडे कधी खेळला होता?
तसं पाहिलं, तर 2019नंतर अश्विन फक्त 2 वनडे सामने खेळला आहे. हे दोन्ही सामने त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच खेळले होते. या दोन्ही सामन्यात त्याला फक्त एक विकेट घेता आली होती. त्याने अखेरचा वनडे सामना 2022मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात त्याने 10 षटके गोलंदाजी करून 68 धावा खर्च केल्या होत्या. यावेळी त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. हा सामनाही भारतीय संघ 7 विकेट्सने पराभूत झाला होता. असे असले, तरीही अनुभवाच्या जोरावर अश्विनला भारतीय संघात स्थान मिळण्याची जास्त शक्यता आहे.
BREAKING NEWS 🚨
Ravichandran Ashwin likely to be included in the Indian Cricket Team squad for Asia Cup & ICC Cricket World Cup 2023🇮🇳
Ravichandran Ashwin's experience on Indian spinning tracks is the reason behind his inclusion. #AsiaCup #Ashwin #cricketnews pic.twitter.com/bCpZ1PS6MF— YEESH KAPOOR (@DalchawalOG) August 19, 2023
अश्विनच्या वनडे कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने भारतीय संघाकडून आतापर्यंत 113 वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने 4.94च्या इकॉनॉमी रेटने 151 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान 25 धावा खर्चून 4 विकेट्स ही त्याची वनडेतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. (spinner Ravichandran Ashwin likely to be included in the Indian Cricket Team squad for Asia Cup & ICC Cricket World Cup 2023)
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! हैदराबाद क्रिकेट एसोसिएशनने वाढवंल बीसीसीआयचं टेन्शन, पत्र लिहून मांडली व्यथा
काळी जादू! Asia Cup 2023 जिंकण्यासाठी आगीच्या निखाऱ्यांवर चालला ‘हा’ क्रिकेटर, व्हिडिओ जगभरात व्हायरल