भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआयने गुरुवारी (दि. 30 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या तिन्ही क्रिकेट प्रकारातील मालिकेसाठी भारतीय संघ घोषित केला आहे. खरं तर, टी20 संघात जास्त बदल केले नाहीयेत, पण वनडे आणि कसोटी संघातून अनेक दिग्गजांना बाहेर केले आहे. तसेच, काही नवीन चेहऱ्यांनाही संघात जागा दिली आहे. यामध्ये तमिळनाडूचा युवा फलंदाज साई सुदर्शन याच्या नावाचाही समावेश आहे. सुदर्शनला वनडे संघात निवडले आहे. या घोषणेनंतर लगेच रविचंद्रन अश्विन साई सुदर्शन याचे अभिनंदन करत मोठी गोष्ट बोलला.
काय म्हणाला अश्विन?
आर अश्विन साई सुदर्शन (R Ashwin Sai Sudarshan) याचे कौतुक करत एक्स हँडलवरून ट्वीट केले. तो म्हणाला, “व्वा साई सुदर्शन व्वा! वास्तवात या मुलासाठी खूप आनंदी आहे, जो शानदार प्रदर्शन करत आहे. मागील काही दिवसात त्याने कुठलीच कसर सोडली नाहीये. मी पूर्णपणे रोमांचित आहे. शाबास भारतीय संघ.”
Wow Sai sudarshan wow!
Genuinely happy for a kid who has been chasing excellence and not left any stone unturned. 👏👏👏
Totally thrilled . Well done #TeamIndia— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) November 30, 2023
यानंतर अश्विनचे ट्वीट काही वेळातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. क्रिकेट चाहते आपापल्या पद्धतीने यावर प्रतिक्रिया देत आहेत. खरं तर, तमिळनाडूचा हा युवा फलंदाज इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेत मागील दोन हंगामांपासून गुजरात टायटन्स संघाकडून खेळत आहे.
देशांतर्गत क्रिकेटमधील सुदर्शनचे शानदार प्रदर्शन
खरं तर, साई सुदर्शन याच्याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वनडे क्रिकेट प्रकारात भारतीय संघात रजत पाटीदार आणि रिंकू सिंग यांनाही संधी मिळाली आहे. तसेच, प्रसिद्ध कृष्णा आणि ऋतुराज गायकवाड यांना कसोटी संघात पहिल्यांदा संधी मिळाली आहे. साई सुदर्शनविषयी बोलायचं झालं, तर त्याने आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाकडून 13 सामन्यात फलंदाजी करताना 507 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या 96 आहे. याव्यतिरिक्त साई सुदर्शन तमिळनाडूकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. त्याने यादरम्यान 11 सामन्यात 43.63च्या सरासरीने 829 धावा केल्या आहेत. यामध्ये 179 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या राहिली आहे. (spinner ravichandran ashwin was elated on Sai Sudharsans entry into team india for south african tour)
हेही वाचा-
कसोटी-टी20 संघात संधी न मिळालेल्या चहलचे लक्षवेधी ट्वीट, फक्त चारच शब्दात म्हणाला…
अर्रर्र! बलाढ्य संघाच्या ‘या’ खेळाडूची इंटरनॅशनल क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती, नुकतीच झालेली वनडे संघात निवड