भारतीय संघाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेची सुरुवात दणक्यात केली आहे. 27 जुलै रोजी पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा 5 विकेट्सने विजय झाला. यासह भारत मालिकेत 1-0ने आघाडीवर आला. या सामन्यात भारतीय फिरकीपटू चमकले. फिरकीपटू रवींद्र जडेजा याने 3 विकेट्स घेतल्या. या विकेट्स घेत त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध इतिहास घडवला आहे.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. गोलंदाजांनी वेस्ट इंडिजला 23 षटकात अवघ्या 114 धावांवर गुडघे टेकायला भाग पाडले. भारतीय गोलंदाजांच्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर अनेक विक्रम मोडले गेले. त्यापैकीच एक विक्रम रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यानेही आपल्या नावावर केला.
जडेजाने घडवला इतिहास
सामन्यात 6 षटके गोलंदाजी करत 37 धावा खर्चून 3 विकेट्स नावावर करताच रवींद्र जडेजाच्या वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक विकेट्स झाल्या. आता जडेजा वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. जडेजाच्या नावावर वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक 44 विकेट्स झाल्या. त्याने भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या 43 विकेट्सच्या विक्रमालाही तडा दिला. तसेच, जडेजाने अनिल कुंबळे (41) यालाही पछाडले.
पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये यादीत शमी आणि हरभजनचेही नाव
याव्यतिरिक्त या यादीत मोहम्मद शमी याचेही नाव आहे. शमीने वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंत 37 विकेट्स घेतल्या आहेत. यादीत पाचवे नाव हरभजन सिंग याचे असून त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 33 विकेट्स घेतल्या आहेत. जडेजा या यादीत अव्वलस्थानी असून मालिकेतील आणखी 2 सामने बाकी आहेत. अशात ‘जड्डू’ नावाने प्रसिद्ध असलेल्या जडेजाकडे आपली आघाडी वाढवण्याची खास संधी आहे.
वनडेत वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज
44- रवींद्र जडेजा
43- कपिल देव
41- अनिल कुंबळे
37- मोहम्मद शमी
33- हरभजन सिंग
And just like that, @imjadeja has scalped THREE wickets in no time 😎
Courtesy of some excellent slip catching 🙌@imkuldeep18 with the latest wicket & West Indies are 99/7
Follow the Match – https://t.co/OoIwxCvNlQ…… #TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/1uYvpB1qp1
— BCCI (@BCCI) July 27, 2023
भारतीय गोलंदाजांची कमाल
भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिज संघाविरुद्ध शानदार प्रदर्शन केले. भारताकडून कुलदीप यादव याने 4 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, त्याने यावेळी 3 षटके गोलंदाजी करताना 2 निर्धाव षटके टाकून फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. (spinner ravindra jadeja now have the most wickets against west indies in odi format read)
महत्त्वाच्या बातम्या-
भारताने विजय मिळवूनही कर्णधार रोहित दु:खीच! म्हणाला, ‘अपेक्षाच नव्हती की, आम्ही 5…’
पहिल्या वनडेत टीम इंडियाचा शानदार विजय! कुलदीप-जड्डूनंतर ईशान चमकला