आशियाई क्रीडा स्पर्धेत गतविजेत्या भारतीय हॉकी संघाचा सलामीचा सामना हॉंगकॉंगशी २२ ऑगस्टला होणार आहे.
या स्पर्धेत भारतीय संघाचा ‘अ’ गटात समावेश करण्यात आला आहे. ‘अ’ गटत भारताबरोबर श्रीलंका, कोरिया, जपान आणि हॉंगकॉंगचा समावेश आहे.
तर भारतीय महिला हॉकी संघाचा सलामीचा सामना यजमान इंडोनेशिया विरुद्ध १९ ऑगस्टला होणार आहे.
भारतीय महिला हॉकी संघ या स्पर्धेत ‘ब’ गटात समाविष्ट आहे. ‘ब’ गटात भारताबरोबर कोरिया, थायलंड, कझाकस्तान आणि यजमान इंडोनेशिया या संघांचा समावेश आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकी खेळ प्रकाराचा अंतिम सामना ३१ ऑगस्टला होणार आहे. तर पुरुष हॉकीचा अंतिम सामना १ सप्टेंबर रोजी होणार आहे.
आशियाई क्रिडा स्पर्धेतील विजेता, पुरुष आणि महिला हॉकी संघ २०२० च्या टोकियो ऑलंपिक स्पर्धेसाठी थेठ पात्र होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-वनडे मालिका विजयासाठी भारत आणि इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या निर्णायक सामन्याविषयी सर्वकाही…
-कुलदीप यादवला निष्प्रभ ठरवण्यासाठी आम्ही सज्ज- मार्क वुड