शारजहा येथे होणाऱ्या टी-१० लीगच्या दुसऱ्या मोसमासाठी आयसीसीने अधिकृत मान्यता दिली आहे.
या लीगच्या दुसऱ्या मोसमाला २३ नोव्हेंबरपासून सुरवात होणार आहे. या लीगच्या पहिल्या मोसमात ६ संघ सहभागी झाले होते. यावेळी यामध्ये दोन नव्या संघांचा समावेश होणार आहे.
आयसीसीच्या सर्व अटी आणि शर्ती मान्य केल्यानंतर या लीगला, आयसीसीने मान्यता दिली आहे.
तसेच या टी-१० लीगला आयसीसीची मान्यता मिळणे लीगच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.
टी-१० लीग आईसीसीचा सदस्स असलेल्या अमीरात क्रिकेट मंडळाची फ्रेंचाइजी स्पर्घा आहे.
आयसीसीने या स्पर्धेला जरी मान्यता दिली असली तरी, आयसीसी यासारख्या लीग स्पर्धेला कोणत्याही प्रकारे प्रोहत्सान आणि संरक्षण देणार नाही. असे आयसीसीच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.
या टी-१० लीगच्या पहिल्या मोसमात विरेंद्र सेहवाग, शाहिद आफ्रिदी आणि क्रिस गेलसारखे दिग्गज सहभागी झाले होते.
यापूर्वी काही क्रिकेट जानकारांनी टी-१० क्रिकेटमुळे टी-२० क्रिकेटची लोकप्रियता कमी होण्याची शक्यता वर्तवली होती.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट सोबतचा फोटो शेअर करत पाकिस्तानी गोलंदाजाने स्वत:लाच केले ट्रोल
–विराट कोहलीचे भारतीय चाहत्यांना भावनिक अावाहन