भारत-इंग्लंड यांच्यात १ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे.
त्यापूर्वी इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने एका संकेतस्थळाशी बोलताना या मालिकेविषयी त्याची विविध मते व्यक्त केली आहेत.
“ही कसोटी मालिका अत्यंत चुरशीची होणार आहे. दोन्ही संघांसोबतच खेळपट्टी तयार करणाऱ्या क्युरेटरलादेखील खेळपट्टी कशी असेल याची कल्पना नाही. कारण गेल्या कित्येक वर्षांमध्ये इंग्लंडमधील वातावरण प्रथमच बदलले आहे.” एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना ब्रॉड म्हणाला.
सध्या इंग्लंडमधील कोणतेही मैदान असो त्यावर जो गोलंदाज तेथील परिस्थितींशी जुळवून घेईल तोच यशस्वी होणार आहे. असे स्टुअर्ट ब्रॉडचे मत आहे.
“यावेळी इथल्या प्रत्येक मैदानावरील खेळपट्टी वेगळी असणार आहे. गेल्या दोन वर्षात लॉर्ड्सची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करत आहे. मोइन अली आणि पाकिस्तानच्या यासिर शाहने इथे दहा-दहा बळी मिळवले आहेत. तर ट्रेंट ब्रिजवर फिरकी गोलंदाजांना संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे प्रत्येक गोलंदाजाला प्रत्येक मैदानावर वेगवेगळी कौशल्ये वापरावी लागतील. असे ब्रॉड म्हणाला.
पुढे ब्रॉडने फिरकी गोलंदाजां विषयीही आपले मत मांडले.
“ही कसोटी मालिका कशी होईल हे सांगणे अशक्य आहे. जर फिरकी गोलंदाजांना मदत मिळाली तर फिरकी गोलंदाजांच्या खांद्यावर जास्त भार पडणार आहे. त्यामुळे सहाजिकच वेगवान गोलंदाजांच्या वाट्याला कमी षटके येतील.” असे मत स्टुअर्ट ब्रॉडने व्यक्त केले.
या कसोटी मालिकेसाठी भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघानी जोरदार तयारी केली आहे.
भारताच्या दृष्टीने ही कसोटी मालिका अत्यंत महत्त्वाची अाहे. तर इंग्लंडने सुद्धा या मालिकेसाठी कंबर कसली आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-“कैसे ना हो गुजारा, जब साथ हो कोहली और पुजारा” गब्बरच्या ट्विटने जिंकली लाखो चाहत्यांची मने
-या खेळाडूने घ्यावी रोनाल्डोची जागा, रियल माद्रिदच्या चाहत्यांची मागणी