भारताच्या इंग्लंड क्रिकेट दौऱ्याचे अधिकृत प्रसारण करणाऱ्या सोनी नेटवर्क इंडियाने २७ जून रोजी समालोचक पॅनेलची घोषणा केली.
यामध्ये भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, अशिष नेहरा, सुनिल गावस्कर, संजय मांजरेकर, ग्रॅमी स्वान, अॅलन विल्किन्स आणि स्टार समालोचक हर्षा भोगले यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच गौरव कपूर, विवेक राजदान आणि दीपदास गुप्ताचाही यात समावेश आहे.
भारत-इंग्लंड यांच्यातील तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि पाच कसोटी सामन्यांच्या दरम्यान एक्सट्रा इनिंग्स या कार्यक्रमात प्री मॅच, मिड मॅच आणि पोस्ट मॅच विश्लेषनातून भारतीय क्रिकेट चाहत्यांना वेगळा अनुभव देण्याचा सोनी इंडियाचा प्रयत्न आहे.
या समालोचक पॅनेलमध्ये निवड झालेला भारताचा माजी कर्णधार गांगुली समालोचन करण्यासाठी उत्सुक आहे.
“गेल्या काही वर्षात इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघासाठी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. पण इंग्लड दौऱ्यावर गेलेला आत्ताचा संघ फॉर्ममध्ये असल्याने भारताचा हा दौरा अटातटीचा होणार आहे. माझ्या इंग्लंडमध्ये क्रिकेट विषयी अनेक आठवणी आहेत. त्या चाहत्यांशी समालोचनातून शेअर करण्यासाठी मी उत्सुक आहे.” असे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली समालोचक पॅनेलमध्ये निवड झाल्यावर म्हणाला.
भारताचा दोन महिन्यांपेक्षा जास्त चालणारा इंग्लंड दौरा ३ जुलैपासून सुरू होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-…तर भारत-पाकिस्तान जागतिक क्रिकेटवर राज्य करु शकतात!
-रहाणेला वनडेत का संधी दिली नाही? मुंबईकर दिग्गजाचे निवड…